AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FD Interest : मुदत ठेवीत गुंतवणूक करायचीये, थोडा वेळ थांबा, नाहीतर बसेल फटक

FD Interest : मुदत ठेवीत गुंतवणुकीची योजना असेल तर थोडे थांबा, घाई कराल तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. यामागील कारण तरी काय,कसा होईल तुम्हाला फायदा

FD Interest : मुदत ठेवीत गुंतवणूक करायचीये, थोडा वेळ थांबा, नाहीतर बसेल फटक
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 7:41 PM

नवी दिल्ली : देशातील काही बँका मुदत ठेव योजनेवर (FD) 9 टक्के व्याज ऑफर करत आहेत. त्यामुळे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. गुंतवणुकीसाठी अनेकांनी घाई केली आहे. पण तुम्हाला अधिकचा परतावा हवा असेल तर मात्र एक आठवडा थांबा. नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला अधिक फायदा मिळण्याची संधी मिळणार नाही. या आठवड्यात असे काय होणार आहे की त्यामुळे तुमचे नुकसान आणि फायदा होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या दोन दिवसात आरबीआयकडून (RBI) मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम तुमच्या एफडीवर होऊ शकतो.

काय होणार निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती रेपो दराविषयीचा निर्णय घेणार आहे. या समितीची बैठक सुरु झाली आहे. 6 एप्रिलपूर्वी हा निकाल येण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने रेपो दरात 0.25 टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रेपो दरात वाढ झाली तर कर्ज महागणार. बँका मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करतील.

हे सुद्धा वाचा

असा होईल फायदा

पतधोरण समितीने रपो रेटमध्ये वृद्धी केल्यास बँका कर्जासोबत एफडीवरील व्याजदरात वाढ करतील. त्यामुळे तुम्ही चार दिवसांनी एफडी केल्यास या वाढीव व्याजाचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळेल. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, सध्या गुंतवणूकदारांनी वाट पाहणे हिताचे ठरेल. यावेळी रेपो दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

असे मिळेल अधिक व्याज

बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एफडीवर जादा व्याज मिळू शकते. पण त्यासाठी सर्वच बँकांच्या एफडीवरील व्याजाची तुलना करा. ज्या ठिकाणी योग्य कालावधीसाठी चांगले व्याज मिळत असेल त्याठिकाणी गुंतवणूक करा. सरकारी बँकापेक्षा खासगी बँकांमध्ये अधिक व्याज मिळते. तुम्हाला अधिक व्याज हवे असेल तर आपोआप नुतनीकरण्याचा (auto-renewal) पर्याय निवडू नका. अनेक बँका हा पर्याय ग्राहकांसमोर ठेवतात. त्यापासून वाचा. ऑटो रिन्युअलमुळे पुढीलवेळी जास्त व्याजाचा पर्याय मिळत नाही.

इतका होईल रेपो दर

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. आता त्यात 25 बीपीएसची वाढ झाल्यास रेपो दर 6.75 टक्के होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.