प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण

अखेर ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बूक केलेल्या ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. ओलाने बुधवारपासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाला सुरुवात केली आहे. कंपनीकडून यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:05 AM

नवी दिल्ली : अखेर ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बूक केलेल्या ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. ओलाने बुधवारपासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाला सुरुवात केली आहे. कंपनीकडून यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्राहकांना स्कूटरचे वितरण करण्यात आले.

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

ओलाने बुधवारी आपल्या बहुप्रतिक्षीत इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाला सुरुवात केली आहे. यासाठी ओलाकडून खास अशा वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये 100 ग्राहकांना एस वन आणि एस वन प्रो मॉडेलचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरूण दुबे यांनी म्हटले आहे की, आज आमच्या सर्व ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आजपासून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाची सुरुवात झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणारा जगातील एक प्रमुख देश म्हणून भरताला आम्हाला पुढे आणायचे आहे. वितरणाला सुरुवात झाली आहे. ज्यांनी गाड्या बूक केल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर त्यांची वाहने मिळावीत यासाठी कंपनी आपल्या उत्पादन वाढीवर भर देत आहे.

केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार

ओलाची ही  इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. हा दावा खरा ठरल्यास ओलाची ही स्कूटर,  स्कूटर अ‍ॅथर 450X आणि TVS iQube सह इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये अधिक मायलेज देऊ शकते.

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत 15 टक्के स्कूटर करण्याचे लक्ष्य

2022 च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15 टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून, या स्कूटरची निर्यातही कंपनीला करायची आहे. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करून, ती जनतेला परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे लक्ष असल्याचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.