घर खरेदी करायचंय? मग ‘असे’ करा पैशांचे नियोजन; अतिरिक्त आर्थिक ताण टाळा

बहुतांश जणांचं कर्ज घेऊनच घराचं स्वप्न पूर्ण होतं. मात्र, गृहकर्ज मिळणं तेवढं सोपं नाही. अशावेळी पैशांची तजबीज करणं जरूरी आहे. घर घेण्यासाठी पैशांचे नियोजन कसे करावे हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

घर खरेदी करायचंय? मग 'असे' करा पैशांचे नियोजन; अतिरिक्त आर्थिक ताण टाळा
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 5:30 AM

पुणे : पुण्यात (pune) आयटी कंपनीत काम करणारा राहुल त्याच्या पत्नीसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेला. दोघांना फ्लॅटही आवडला. त्यानंतर बिल्डरनं (Builder)पेमेंट प्लॅनविषयी विचारल्यानंतर त्यांच्याकडे ठोस उत्तर नव्हतं. राहुलनं तर यासंबंधात कधी नियोजनही केलं नाही. घरांच्या (house) किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्यानं कर्ज घेतल्याशिवाय घर खरेदी करता येणं शक्य नाही. बहुतांश लोक कर्ज घेऊनचं ड्रीम होमचं स्वप्न पूर्ण करतात. आरबीआयच्या आकडेवारीनुसार बँका आणि इतर वित्तीय संस्थांची सुमारे 14 लाख कोटी रुपयांची गृहकर्जाची थकबाकी आहे. आयआयएफएल IIFLच्या रिपोर्टनुसार येत्या दोन ते तीन वर्षांत यात 15 ते 18 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर खरेदीचा विचार करत असताल तर त्यासाठी ठोस नियोजन करा.तुमच्या ड्रीम होमच्या निवडीसाठी वेळ लागू शकतो. मात्र त्याच्या अगोदरच पेंमेट प्लान तयार करणं गरजेचं आहे. सुरूवातीपासूनच पैशाचं नियोजन करा.

सिबिल स्कोर महत्त्वाचा

गृहकर्जासाठी अर्ज केल्यांतर बँक तुमचा सिबिल स्कोअर चेक करते. बँका सिबिल स्कोअर पाहूनच कर्ज देतात. त्यामुळे घर खरेदीच्या नियोजनात सिबिल स्कोअर महत्वाचा असा घटक आहे. विविध कारणांमुळे क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. क्रेडिट स्कोअरमधील दोष दूर करूनच तुम्ही बँकेशी संपर्क साधा. यासाठी काही वेळ लागू शकतो, म्हणून सिबिल रिपोर्ट लवकर घ्या. घर खरेदीचा निर्णय निश्चित झाल्यानंतर मनपसंद घर मिळेपर्यंत तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. तुमचा सिबील स्कोअर चांगला असल्यास किती कर्ज मिळू शकते याचा अंदाज येतो.बचत आणि कर्ज किती मिळत आहे यानुसार तुम्ही नियोजन करू शकता. तुम्ही घर निवडीपूर्वीच कर्ज मंजूर करून घेतलं असल्यास बिल्डरलाही तुमच्या पैशाच्या नियोजनाची माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही घराच्या किंमतीबाबत घासाघीस करू शकता. प्री अप्रव्हड लोनचा कालावधी हा एक वर्षासाठी वैध असतो हे कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे पैशाचं नियोजन असल्यानं बाजारभावापेक्षा कमी दरात घर मिळू शकतं.

पूर्णपणे कर्जावर अवलंबून राहू नका

तुमचं बजेट आणि गृहकर्ज याची रक्कम निश्चित झाल्यानंतर इतर पैशांची तुम्ही जुळवाजुळव करा. व्यावहारिक भाषेत याला मार्जिन मनी असे म्हणतात. बहुतांश वेळा घराच्या किंमतीच्या 80 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. स्टॅप ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या पैशाची जमवाजमव तुम्हाला स्वत: ला करावी लागते. घर खरेदीच्या निर्णयानंतर विविध ठिकाणी गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम बँकेत जमा करा. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधील रक्कम योग्य वेळी काढा. त्यानंतर किती गृहकर्ज घ्यायचं आहे याचा तुम्हाला अंदाज येतो. कर्जाचे योग्य नियोजन केल्यात तुमच्यावर पडणारा अतिरिक्त आर्थिक ताण कमी होतो.

संबंधित बातम्या

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा

रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार – सर्व्हे

नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.