IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

आयपीओंना (IPO) चांगली बोली लागल्यास लिस्टिंग चांगल्या प्रकारे होते. साधं गणित आहे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यास नफा मिळणाची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचा आयपीओला कसा प्रसिसाद आहे त्याचा आधी निट अभ्यास करावा.

IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या
आयपीओमध्ये गुंतवणूक
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:40 AM

मुंबई : नायका आणि देवयानीची दिमाखदार लिस्टिंग पाहून पुण्यातील प्रियांकानं आयपीओ (IPO) खरेदी करून नशिब आजमावण्याचं ठरवलं. काही दिवसानंतर फिनटेक कंपनी पेटीमचा (Petim) इश्यू बाजारात आल्यानंतर पहिल्याच तासात शेअर्ससाठी (Shares) अर्ज सादर केला. प्रियांकाला पेटीएमचे शेअर्सही मिळाले. मात्र खरेदी केलेल्याच दिवशी इश्यू प्राईसमध्ये 27 टक्के घसरण झाली. प्रियांकाप्रमाणेच अनेक जणं बाजारात येत असलेल्या IPO मध्ये आपलं नशिब आजमावत आहेत. गुंतवणूकदार शेअर्स बाजाराकडे आकर्षित झाल्यानं गेल्या एक वर्षात गुंतवणूकदारांनी 3 कोटी नवीन डीमेट खाते उघडले आहेत. शेअर बाजारात तेजी आल्यानंतर अनेक जणांनी IPO खरेदी केले. विशेषत: नवीन गुंतवणूकदार मोठ्या नफ्याच्या अपेक्षेनं शेअर बाजारात गुंतवणूक करतात मात्र मुलभूत गोष्टी माहित नसल्याने त्यांचे नुकसान होते, असं जियोजित फायनांशियल सर्विसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार वी.के.विजयकुमार यांनी म्हटले आहे. प्रियांकासोबत जे झालं ते तुमच्यासोबत होऊ नये यासाठी आयपीओ संदर्भातील या मूलभूत गोष्टी समजून घ्या.

गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

आयपीओंना चांगली बोली लागल्यास लिस्टिंग चांगल्या प्रकारे होते. साधं गणित आहे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यास नफा मिळणाची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचा आयपीओला कसा प्रसिसाद आहे त्याचा आधी निट अभ्यास करावा. शेवटच्या दिवशी मोठ्या गुंतवणूकदाराचा आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असल्यास शेवटच्या तासात लहान गुंतवणूकदारांनी आयपीओसाठी अर्ज करावा असा सल्ला अनलिस्टेड अरिनाचे, को-फाऊंडर अभय दोशी देतात. मोठे गुंतवणूकदार पहिल्या दोन दिवसांत गुंतवणूक करण्यास इच्छुक नसतात. मोठे गुंतवणूकदार कर्ज घेऊन आयपीओ खरेदी करतात. त्यामुळे त्यांचे दोन दिवसांचे व्याज वाचते. त्यामुळे आयपीओ खरेदीसाठी घाई न करता मोठा गुंतवणूकदारांचा अभ्यास करावा.

गुंतवणूकदारांचे प्रकार

आयपीओमध्ये 3 प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात पहिले पात्र संस्थागत गुंतवणूकदार म्हणजेच QIB यात बॅक, म्युच्युअल फंड आणि वित्तीय संस्था याचा समावेश असतो. दुसरे मोठे गुंतवणूकदार म्हणजेच HNI तिसरे, किरकोळ गुंतवणूकदार म्हणजेच RII प्रत्येक आयपीओमध्ये यांच्यासाठी आरक्षण असते. वित्तीय संस्था आणि मोठे गुंतवणूकदार शेवटच्या दिवशीच गुंतवणूक करतात. कारण ते कर्ज घेऊन गुंतवणूक करत असतात. शेवट्या दिवशी गुंतवणूक केल्याने त्यांचे दोन दिवसांचे कर्ज वाचते. त्यामुळे मोठे गुंतवणूकदार काय करत आहेत, ते कुठे गुंतवणूक करत आहेत, याचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

संबंधित बातम्या

मार्केट ट्रॅकर: घसरणीचे सलग 3 आठवडे, रशिया-यूक्रेन वादाचा परिणाम; 10.5 लाख कोटी बुडाले

एलआयसी आयपीओत ‘फॉरेन’ एन्ट्री; 20 टक्के एफडीआयला मान्यता, केंद्राची मोहोर

रशिया, युक्रेन युद्धाचा वाहन उद्योगाला फटका; वाहानाच्या किंमती वाढणार?

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.