What is AIS : काय आहे AIS? इनकम टॅक्सच्या नोटीसपासून कसे वाचाल

What is AIS : कर भरत असाल तर तुम्हाला AIS माहिती आहे का? इनकम टॅक्सच्या नोटीसपासून कसे वाचाल, ही प्रक्रिया केल्यास तुम्हाला होईल मोठा फायदा..

What is AIS : काय आहे AIS? इनकम टॅक्सच्या नोटीसपासून कसे वाचाल
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 5:09 PM

नवी दिल्ली : सध्या आयकर रिटर्न (Income Tax Return Filing) भरण्याचा हंगाम आहे. प्राप्तिकर भरण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरु आहे. 15 जूननंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना फॉर्म-16 देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यावेळी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाईन 31 जुलै 2023 ही आहे. अंतिम मुदत संपण्यापूर्वी आयटीआरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. कर भरत असाल तर तुम्हाला AIS माहिती आहे का? इनकम टॅक्सच्या नोटीसपासून कसे वाचाल, ही प्रक्रिया केल्यास तुम्हाला होईल मोठा फायदा..

केवळ फॉर्म-16 ने नाही होणार काम आयकर भरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमची छोटी चूक ही महागात पडू शकते. प्राप्तिकर विभागाची नोटीस (Income Tax Notice) तुम्हाला पण येऊ शकते. करदात्यांना कर भरण्या अगोदर काही गरजेचे कागदपत्रे तपासून घेणे आवश्यक आहे. वेतनदार करदात्यांना फॉर्म-16 अत्यंत महत्वाचा दस्तावेज असतो. तुम्ही पगाराव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कमाई होत असेल तर केवळ फॉर्म-16 उपयोगाचा ठरत नाही.

हे दोन कागदपत्रे महत्वाची पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोताकडून तुम्हाला उत्पन्न होत असेल तर इतर कागदपत्रांची तुम्हाला गरज पडते. आयकर खाते यामुळेच करदात्यांना वारंवार इशारा देते. त्यांना एआयएस (AIS) आणि टीआयएस (TIS) आवश्यक तपासा. त्यामुळेच प्रत्येक करदात्यांना ही दोन्ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी मुभा देण्यात येते. आयटीआर फाईलिंग अधिक पारदर्शक होण्यासाठी या दोन्ही कागदपत्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही कागदपत्रांमुळे केवळ इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे सोपे झाले आहे. तसेच यामुळे अनेक चुका ही टळतात.

हे सुद्धा वाचा

काय आहे एआयएस आणि टीआयएस सर्वात अगोदर हे एआयएस आणि टीआयएस काय आहे, हे समजून घेऊयात. वार्षिक विवरण अहवाल (Annual Information Statement) आणि करदात्यांच्या विवरण तपशील (Taxpayer Information Summary) अशी ही दोन कागदपत्रे आहेत. या दोन्ही कागदपत्रांमध्ये कमाईचा सर्व तपशील असतो. तुमच्या बचत खात्यातील व्याज, आवर्ती ठेव योजना आणि मुदत ठेव योजना (Recurring and Fixed Deposit Income) व्याजातून होणारी कमाई यांचा तपशील असतो. तसेच शेअर बाजारा, लाभांश आणि म्युच्युअल फंडातून (Mutual Fund) होणाऱ्या कमाईचा तपशील यामध्ये असतो.

उत्पन्नाची माहिती सोप्या शब्दात एआयएसमध्ये करदात्यांच्या करपात्र उत्पन्नाचा तपशील (Taxable Amount) एकाच ठिकाणी मिळतो. एआयएसमध्ये वेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतातून होणारी कमाई कळते. प्राप्तिकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) अंतर्गत सर्व माहिती, विवरण या एका कागदपत्रात ठळकपणे दिसून येते.

असे करा एआयएस/टीआयएस डाऊनलोड 

  1. प्राप्तिकर फाईलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) उघडा
  2. पॅन क्रमांक (PAN Number) पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा
  3. सर्वाच वरच्या मेन्यूमध्ये सर्व्हिसेज टॅबवर जा
  4. ड्रॉपडाऊनमध्ये ‘Annual Information Statement (AIS)’ हा पर्याय निवडा
  5. प्रक्रिया, प्रोसिडवर क्लिक करा, एक स्वतंत्र विडो ओपन होईल
  6. नवीन संकेतस्थळावर AIS चा पर्याय निवडा
  7. आता तुम्हाला AIS आणि TIS असे दोन्ही पर्याय दिसतील
  8. AIS आणि TIS, PDF वा JSON या फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करता येईल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.