Pan card News | पॅन कार्डच्या 10 क्रमांकांचा अर्थ काय? तुम्हाला माहिती आहे का?

Pan card News | पॅनकार्ड हा तुमच्या आर्थिक व्यवहारांचा महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. तर या पॅनकार्डवरील 10 अंकी आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Pan card News | पॅन कार्डच्या 10 क्रमांकांचा अर्थ काय? तुम्हाला माहिती आहे का?
तुमच्या पॅनकार्ड जन्मकुंडलीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:49 PM

Pan card News | पॅनकार्ड (Pan card)अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर हे आता एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. इन्कम टॅक्स भरण्याबरोबरच बँक खात्यांशी संबंधित कामांमध्ये त्याची नेहमी आवश्यकता पडते. त्याचबरोबर तुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी आणि त्याच्या नोंदीसाठी हे महत्वपूर्ण आहे. खरंतर पॅन कार्ड हा 10 अल्फान्यूमेरिक नंबर (Alphanumeric Number) आहे. पॅन कार्ड आयकर विभागाकडून देण्यात येते. आपण कधी विचार केला आहे की या अल्फान्यूमेरिक संख्यांचा अर्थ काय आहे? ते अल्फान्यूमेरिक पद्धतीने का लिहिले जातात? त्याचा तुमच्या आर्थिक व्यवहारा काही फरक पडतो का? या आकड्यांमुळे आणि अक्षरांमुळे तुमच्या कार्डची माहिती आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा काय परस्पर संबंध असतो? या संबंधीची माहिती तुम्हाला आहे का? नसेल तर ती आपण समजून घेऊयात.

पॅन कार्ड नंबरचा अर्थ

पॅन कार्डमध्ये अल्फान्यूमेरिक 10 अंक आहेत. यूटीआय (UTI) किंवा एनएसडीएलच्या (NSDL) माध्यमातून आयटी विभागाकडून हे जारी केले जाते. हे मोबाइल नंबरइतके साधे सोपे नाही. त्याऐवजी, प्रत्येक वर्णमाला किंवा संख्ये मागे एक माहिती दडलेली असते. पॅन कार्डच्या 10 अंकातील पहिले 5 अंक हे वर्णमाला आहेत. त्यांच्या मागे 4 अंक गणिक असतात आणि शेवटी पुन्हा एक वर्णमाला असते.

हे सुद्धा वाचा

सुरुवातीची 5 कॅरेक्टर्स

पॅन कार्डमधील पहिल्या 5 कॅरेक्टर्सपैकी पहिली तीन कॅरेक्टर्स प्राप्तिकर खात्याच्या अल्फाबेट सीरिजचं प्रतिनिधित्व करतात, जी एएए (AAA) ते झेडझेड (ZZ) या सीरिजमध्ये येते. चौथ्या कॅरेक्टर्स मध्ये तुमची प्राप्तिकर खात्याच्या दृष्टीने ओळख दडलेली असते. जसे की नोकरदार, व्यापारी किंवा अन्य उत्पन्न गट

प्रत्येक अक्षराचं महत्व

पॅन कार्डवरील या मालिकेतील प्रत्येक अक्षराला काही ना काही सांगायचे असते. अविभाज्य करदात्यांसाठी प्राप्तिकर विभाग P हे चौथे पात्र म्हणून वापरते. C कंपनीसाठी वापरला जातो. H हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (HUF) वापरला जातो. A चा वापर असोसिएशन ऑफ पर्सन्स (AOP) साठी केला जातो. B चा वापर ही असाच (BOI) महत्वासाठी केला जातो. G सरकारी एजन्सीसाठी वापरली जाते. G सरकारी एजन्सीसाठी वापरली जाते. J चा वापर न्यायिक व्यक्तीसाठी केला जातो. L चा वापर स्थानिक प्राधिकरणासाठी केला जातो. F फर्म / मर्यादित उत्तरदायित्व भागीदारीसाठी वापरले जाते.T चा वापर विश्वासासाठी केला जातो.

नावाच्या पहिल्या अक्षराचाही समावेश

पॅन कार्डचे 5 वे कॅरेक्टर आपल्या आडनावाच्या पहिल्या वर्णाचे प्रतिनिधित्व करते. जसं तुमचं आडनाव राजपूत आहे, तसंच मग तुमच्या पॅन नंबरचं पाचवं कॅरेक्टर R असेल. त्याचबरोबर नॉन-इंडिव्हिज्युल पॅन कार्डधारकांसाठी त्यांच्या पॅन नंबरमधील पाचवे कॅरेक्टर हे त्यांच्या नावाचे पहिले अक्षर असेल. पुढील चार वर्ण नेहमीच संख्यात्मक असतात जे पॅन कार्ड मालिकेचे अनुक्रमिक क्रमांक असतात आणि ते 1 ते 9 पर्यंतच्या असलेल्या संख्येचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या पॅन नंबरमधील शेवटचे कॅरेक्टर नेहमीच एक वर्णमाला असते.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.