Income Tax Raid: कोणत्या संपत्तीवर होऊ शकते कारवाई? कुणावर पडते धाड? आयटी छापेमारीविषयी वाचा सविस्तर

आयकर विभागाच्या धाडसत्रात नेमकं घडते काय हा एक उत्सुकतेचा प्रश्न कायम मनात घोळत असतो. चित्रपटात दाखवितात तसे भिंती फोडतात, बाथरुमचे छत तपासतात की देवघरातील एखादी खूंटी हालवून तळमजल्याचं दार उघडंत, कदाचित यातील काही युक्त्या वापरल्याही जात असतील. मात्र सर्वच संपत्ती सील करता येत नाही. जप्तीची ही काही प्रक्रिया असते.

Income Tax Raid: कोणत्या संपत्तीवर होऊ शकते कारवाई?  कुणावर पडते धाड? आयटी छापेमारीविषयी वाचा सविस्तर
युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहावर छापेमारी
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 3:57 PM

देशातील अनेक राज्यात सध्या धाडीची धडधड सुरु आहे. सक्तवसुली संचालनालय (ED), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (Income Tax) या तीन विभागांच्या धाडींनी भल्याभल्या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्याशी संबंधीत कॉर्पोरेट हाऊसेसला, वित्तपुरवठादारांना धडकी भरवली आहे. कोट्यवधींचे घबाड या धाडीत हाती लागत असून काही ठिकाणी  नोटांची बंडल आणि किंमती वस्तू नेण्यासाठी ट्रकचा वापर करण्यात येत आहे. काही असो पण या धाडसत्रात नेमके काय करतात, कोणती संपत्ती जप्तीचा आदेश असतो. कोणती संपत्ती ताब्यात घेता येत नाही, याची नियमावली काय, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्याचेच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न

आयकर अधिनियम 1961 च्या 132 कलमान्वये, ही धाड टाकण्यात येते. कोणत्याही व्यक्तीेच्या घरी अथवा कार्यालयावर धाड टाकण्याचे अधिकार या कलमान्वये आयकर अधिका-याला प्राप्त होतात. हे धाडसत्र गोणत्याही वेळी आणि किती ही वेळ सुरु राहू शकते. या धाडसत्रात काही गडबड आढळल्यास संपत्ती जप्त करण्यात येते. या कारवाई दरम्यान परिसरातील कोणत्याही व्यक्तीची अधिकारी तपासणी करु शकतात. तसेच ज्या ठिकाणी कुलूप लावलेले असेल, संशय येणारे साहित्य, बांधकाम असेल तर ते हटवू शकतात. चला तर जाणून घेऊयात कोणती संपत्ती जप्त करता येते आणि कोणत्या वस्तूवर जप्तीची कारवाई होत नाही.

अधिकारी पुढील मालमत्ता जप्त करू शकतात-

अघोषित कॅश, दागिने

खात्यासंबंधीची कागदपत्रे, चालान, डायरी

कम्प्यूटर चिप्स आणि इतर डाटा स्टोरेज साहित्य

मालमत्तेसंबंधीची महत्वाची कागदपत्रे, विवरण असणारी कागदपत्रे,

ही मालमत्ता जप्त करता येत नाही

कोणत्याही व्यवसायातील स्टॉक इन ट्रेड यापूर्वी आयकर विभाग आणि संपत्ती कर विभागाकडे दिलेली कागदपत्रे खात्यातील घोषीत रक्कमेचे विवरण तसेच खर्चा व्यतिरिक्त योग्य विवरण दिलेली रक्कम संपत्ती कर विभागाकडे पुढे विवरण दिलेली रक्कम, मालमत्ता, दागिने विवाहित महिलेचे 500 ग्रॅमपर्यंतचे आणि अविवाहित महिलेचे 250 ग्रॅमपर्यंतचे सोने, पुरुष सदस्यांचे 100 ग्रॅमपर्यंतचे सोने

इतर बातम्या

Video | ‘नार्वेकरांनंतर आता परबांच्या रिसॉर्टवर हातोडा’, किरीट सोमय्यांनी सांगितलं कधी होणार कारवाई?

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.