एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या उर्वरित अनेक जबाबदाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांना पार पाडाव्या लागतात. यात बँक, विमा, पीपीएफ खाते यासंह इतर कामांचा समावेश आहे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 7:35 AM

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचा अचानक मृत्यू झाला. कोरोनाच्या या युद्धात अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य गमावले. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या उर्वरित अनेक जबाबदाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांना पार पाडाव्या लागतात. यात बँक, विमा, पीपीएफ खाते यासंह इतर कामांचा समावेश आहे. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते, तेव्हा त्यासाठी नेमकं काय करावं लागते, ते खाते बंद करायचे की ते तसेच सुरु ठेवता येते? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

मृत्यूनंतर अकाऊंटचे काय होते?

जर मृताच्या कुटुंबातील सदस्यांना त्या खात्याबद्दल माहिती नसेल आणि पुढे 2 वर्षे त्या खात्यातून कोणताही व्यवहार होत नसेल तर ते इनअॅक्टिव्ह केले जाते. त्यानंतर बँकेकडून त्या ग्राहकाला किंवा नॉमिनीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. ते खाते पुन्हा सुरु करण्यास सांगितले जाते. मात्र जर त्यानंतर पुढील 10 वर्षांपर्यंत इनऑपरेटिव्ह अकाऊंटमधून कोणताही व्यवहार झाला नाही तर त्यात जमा केलेली रक्कम आणि त्याचा व्याज हा शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये (Education and Awareness Fund) ट्रान्सफर केला जातो. दरम्यान याची माहिती ग्राहकांच्या घरी दिली जाते.

अकाऊंटचे काय करावे?

एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याचे अकाऊंट बंद करण्याची घाई करु नका. Money 9 या वेबसाईटवरील एका वृत्तानुसार LLP चे गुंतवणूक सल्लागार हर्ष रुंगटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही मृत व्यक्तीचे बँक खाते बंद करण्याची घाई करू नका. कारण त्यात कौटुंबिक पेन्शन, लाभांश, व्याज यासारखे काही उत्पन्न असतात, जे कुटुंबासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही कोणत्याही मृत व्यक्तीचे अकाऊंट सहजरित्या बंद करु शकता.

अकाऊंट बंद करण्यासाठी अर्ज कधी कराल? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कुटुंबातील सदस्यांसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. आपण कधीही बँकेत खाते बंद करण्यासाठी अर्ज करु शकता. जेव्हा त्या मृत्यू झालेल्या परिवारातील कुटुंब मानसिकदृष्ट्या तयार असेल तेव्हा हे कार्य केले जाऊ शकते. RBI च्या सूचनेनुसार, या अकाऊंटमधील पैसे काढण्यासंबंधिचा अर्ज हा 15 दिवसात करणे गरजेचे आहे.

अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया

जर तुम्हाला एखादे बँक खाते बंद करायचे असेल तर त्याला नोटरी असलेले मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानंतर या अकाऊंटच्या नॉमिनीला हे सर्व पैसे मिळतीत. पण जर त्यासाठी कोणताही नॉमिनी व्यक्ती नसेल तर त्या कुटुंबातील वारसा हक्कानुसारच्या सदस्याला ते पैसे दिले जातील. मात्र यावेळी त्याला मृत्यूच्या दाखल्यासह त्याच्यात आणि मृत व्यक्तीच्या बँकेत नातेसंबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

(What Happens To Bank Accounts After Death check details here)

संबंधित बातम्या : 

रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

‘या’ बँकेची मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा 6 तास राहणार बंद; बँकेने सांगितलं ‘कारण’

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.