तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच

जर तुम्ही गूगल प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) जाऊन कर्जासाठी शोध घ्याल, तर तुम्हाला हजारो पर्याय दिसतील. भारतात अ‍ॅपद्वारे कर्ज देण्याऱ्यांची संख्या वाढलीये. अशा अ‍ॅपवर आरबीआयची (RBI) करडी नजर असतानाही अ‍ॅपची (APP) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची 'डिजिटल दादागिरी' एकदा बघाच
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:30 AM

जर तुम्ही गूगल प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) जाऊन कर्जासाठी शोध घ्याल, तर तुम्हाला हजारो पर्याय दिसतील. भारतात अ‍ॅपद्वारे कर्ज देण्याऱ्यांची संख्या वाढलीये. अशा अ‍ॅपवर आरबीआयची (RBI) करडी नजर असतानाही अ‍ॅपची (APP) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आरबीआयनं अशा 650 अ‍ॅप्सना बेकायदेशीर घोषित केलंय, आरबीआयनंतर गूगलकडून प्लेस्टोअरमधून अशा 100 अ‍ॅप्सना हटवण्यात आलं आहे. मात्र, जास्त नफा मिळत असल्यानं एक अ‍ॅप बंद झाल्यानंतर दोन नवीन अ‍ॅप बाजारात येतात. आरबीआयच्या आकडेवारीनुसार डिजिटल प्लेटफॉर्मवरून ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची संख्या अवघ्या 3 वर्षात 12 टक्क्यांनी वाढलीये. 2017 साली एकूण डिजिटल कर्जाचं वितरण 11,671 कोटी रुपये होतं, 2018 मध्ये 29,888 कोटी, 2019 मध्ये कर्जाचा आकडा 72,663 कोटी होता तर 2020 मध्ये हाच आकडा 1.42 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

तत्काळ कर्ज

बाजारात डिजिटल कर्जाला Early salar किंवा Pay Day नावानं ओळखलं जातं. बँकांच्या तुलनेत डिजिटल कर्ज तत्काळ आणि सहज मिळतं, बँकांतून कर्ज घ्यायचं असल्यास क्लिष्ट प्रक्रिया असते, कागदपत्रांची पूर्तता करावी लागते तसेच इनकम टॅक्स रिटर्न ते कर्ज घेतल्याच्या-परत केल्याच्या इतिहासाची पडताळणी केली जाते. म्हणजेच बँकेत कर्ज घेण्यासाठी किमान 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागते. याउलट डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध होते, ते पण अगदी कमी कागदपत्रांमध्ये. डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून 15 दिवस ते एक महिन्याच्या कालावधीसाठी कर्ज मिळते. कुणाला 10 ते15 हजार रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्यास बँक एवढं कमी कर्ज देत नाही. मात्र डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून असे कर्ज सहज उपलब्ध होते.

कर्ज वसुलीसाठी दबाव

डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी आहे. मात्र, वेळच्यावेळी कर्जाची परतफेड न केल्यास मोठं संकट उभं राहू शकतं. उदाहरणासाठी एका कर्जधारकाच्या फोनवर आलेला हा मेसेज पाहा. कर्जाची परतफेड करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी शिल्लक असतानाही धमकावणारे मेसेज येतात. कर्जाची परतफेड करा, नाहीतर तुमच्या मित्रांना, कुटुंबीयांना आणि इतर नातेवाईकांना माहिती देऊ, असे धमक्याचे मेसेज तुम्हाला येतात. अशाप्रकारच्या घटनेत गेल्या दोन वर्षात लैंगिक शोषणापासून ते आत्महत्यासारख्या घटना समोर आल्या आहेत. एमबीएच्या एका विद्यार्थीनीने आणि एका प्रसिद्ध लेखकाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. डिजिटल कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो. कर्जाची परतफेड करण्यास उशिर झाल्यास व्याजावर व्याज आणि दंड लागतो त्यामुळे कर्जाची रक्कम वाढते. अशाप्रकारे 10 हजार रुपयांचे कर्ज 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. परतफेडीचा दबाव, वाढता व्याजदर, त्यावर बसणारा दंडाचा ताण वाढल्यानं पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतल्या जाते. दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेतो आणि अशाप्रकारे कर्जदार व्यक्ती महागड्या कर्जाच्या चक्रव्यूहात फसतो.

तज्ज्ञ काय सांगतात?

कर्ज देणारे डिजिटल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फेसबुक आणि फोटो गॅलरीची परवानगी मागतात. त्याशिवाय अॅप डाऊनलोड होत नाही. म्हणजे एकाप्रकारे डिजिटल दादागिरी सुरू असते. फोटोंचा गैरवापर, मित्र, नातेवाईक, आई-वडिल ते सासू-सासरे तसेच ऑफिसमधील बॉस यांच्या फोन नंबरवर मेसेज पाठवले जातात. तसेच धमकी देणार फोनसुद्धा येत असल्यानं कर्जदार व्यक्ती अस्वस्थ होतो. सायबर गुन्ह्यांचा तपास करणारे रीतेश भाटिया सांगतात की, कर्ज देणाऱ्या अॅप संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फोनबुक आणि फोटो गॅलरीची परवानगी मागत असल्यास अॅप डाऊनलोड करू नका असे भाटिया यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

PF Interest Rate : पीएफवरील व्याजदर चार दशकांच्या निच्चांकी पातळीवर; सहा कोटी कर्मचाऱ्यांना फटका

नव्या सरकारसमोर बिकट वाट; खर्च, कर्ज आणि वित्तीय तूट भरुन काढण्याचे आव्हान

निवृत्तीनंतर हक्काचा आधार; तुम्हाला ‘ईपीएस’बद्दल माहितीये का?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...