BHSeries: वाहनांसाठी भारत सिरीज लागू; नव्या सिरीजसाठी ‘असा’ करा अर्ज

आता पासिंग नंबर बदलण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून वाहनांसाठी नवी भारत सिरीज सुरू करण्यात आली आहे. या नव्या सिरिजची सुरुवात ही बीएच या अक्षरांपासून सुरू होईल.

BHSeries: वाहनांसाठी भारत सिरीज लागू; नव्या सिरीजसाठी 'असा' करा अर्ज
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:08 PM

नवी दिल्ली : तुम्ही जर अशा क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल, ज्या क्षेत्रामध्ये वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये तुमची बदली करण्यात येते. अशावेळेला तुम्हाला सर्वाधिक भेडसवणारा प्रश्न म्हणेज तुमच्या वाहनांचा पासिंग नंबर हा असतो. दुसऱ्या राज्यात तुमची बदली झाल्यास, पासिंग नंबर बदलण्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. मात्र आता पासिंग नंबर बदलण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून वाहनांसाठी नवी भारत सिरीज सुरू करण्यात आली आहे. या नव्या सिरिजची सुरुवात ही बीएच या अक्षरांपासून सुरू होईल. ही सिरीज किंवा बीएचपासून सुरू होणारा पासिंग नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देशभरात कुठेही फिरू शकता.

काय आहे बीएच सिरीज ? 

आपण जर महाराष्ट्रात राहात असू तर आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवर एमएच अर्थात महाराष्ट्राची सिरीज असते. जर एखाद्या व्यक्ती उत्तरप्रदेशमध्ये राहात असेल तर त्याच्या वाहनाच्या  नंबर प्लेटवर त्याच्या राज्याची सिरीज असते. यामुळे एक तोटा असा होतो, की राज्य बदलताना आपल्याला प्रत्येकवेळी वाहनाची नव्याने नोंदणी कारवी लागते. मात्र हे सर्व टाळण्यासाठी आता परिवहन मंत्रालयाच्या वतीने नवी बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे. देशभरात एकच सिरीज असल्याने आपण कोणत्याही राज्यामध्ये गेलो तरी आपल्याला पुन्हा वाहनाची नोंदणी करण्याची गरज नाही.  ही सिरीज घेण्यासाठी संबंधित मालकाने कमीत कमी दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा.

कोणाला होणार फायदा?

या ‘बीएच’ सिरीजचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच ज्या व्यक्तींची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी देखील ही सिरीज महत्त्वपूर्ण आहे.

बीएच सिरीजसाठी अर्ज कसा करावा? 

तुम्हाला जर बीएच सिरीज हवी असल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा. जर तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असेल तर तुम्हीही बीएच सिरीज घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. आपण वाहन डीलरच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतो. नोंदणी करताना तुम्हाला विचारण्यात आलेले सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या 

शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 611 अंकाच्या वाढीसह बंद; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा; दिल्लीसह महत्त्वाच्या शहरातील कार्यालयांची झाडाझडती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.