Digital Condom : डिजीटल कंडोम नेमकं काय आहे? त्याचा वापर कसा होतो? लाँच होताच संपूर्ण जगात खळबळ

डिजीटल कंडोमला CAMDOM नावाने ओळखलं जातं. खरं तर हे एक अ‍ॅप आहे. या डिजीटल कंडोमचा वापर नेमका कसा करायचा? याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. विशेष म्हणजे डिजीटल कंडोम अ‍ॅप लाँच झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Digital Condom : डिजीटल कंडोम नेमकं काय आहे? त्याचा वापर कसा होतो? लाँच होताच संपूर्ण जगात खळबळ
डिजीटल कंडोम नेमकं काय आहे?
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 5:15 PM

सध्याचं जग हे ‘डिजीटल जग’ म्हणून ओळखलं जातं. डिजीटल जगात काहीच अशक्य नाही. एकेकाळी पुस्तकं वाचून, टीव्ही पाहून ज्ञान मिळायचं. पण आता डिजीटल मीडियावर इतक्या साऱ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत की, ही एका क्लिकवर सारं काही उपलब्ध आहेत. आपण सध्या या डिजीटल क्रांतीच्या युगात जगत आहोत. विशेष म्हणजे नुकतंच आता डिजीटल कंडोम देखील लाँच करण्यात आलं आहे. या डिजीटल कंडोमला CAMDOM नावाने ओळखलं जातं. खरं तर हे एक अ‍ॅप आहे. या डिजीटल कंडोमचा वापर नेमका कसा करायचा? याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. विशेष म्हणजे डिजीटल कंडोम अ‍ॅप लाँच झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेक जण हे अ‍ॅप पाहून हैराण झाले आहेत. तर अनेकजण या कंडोमची प्रशंसा करत आहेत.

खरंतर या डिजीटल कंडोमचा उद्देश हा खूप महत्त्वाचा आहे. जेवढ्या सोप्या पद्धतीने कंडोमचा वापर करणं आहे, तसेच या कंडोमचा वापर हा शारीरिक संबंधादरम्यान परवानगी शिवाय रेकॉर्डिंग करण्यापासून सुरक्षा करणं हा आहे. समाजात नव्या प्रकारची सुरक्षा देण्यासाठी या अ‍ॅपचा विकास करण्यात आला आहे, जेणेकरुन यूजर्सला परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करण्यापासून सुरक्षित केलं जाईल. या अ‍ॅपला जर्मन ब्रांड Billy Boy आणि Innocean Berlin द्वारे विकसित करण्यात आलं आहे. या अ‍ॅपचा उद्देश हा परवानगीशिवाय रेकॉर्डिंगला रोखणं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ता आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये ब्लुटूथच्या माध्यमातून ब्लॉक करु शकतात. यामुळे कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड होणार नाही.

हा अ‍ॅप कसा काम करतो?

या अ‍ॅपला लैंगिक संरक्षणासाठी बनवण्यात आलं आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनला ब्लॉक करुन परवानगी शिवाय रेकॉर्डिंग करण्यास रोखतं. उपयोगकर्त्याला केवळ आपला स्मार्टफोन जोडीदाराच्या स्मार्टफोन जवळ ठेवावा लागेल आणि व्हर्चुअल बटन स्वाईप करावं लागेल. यामुळे कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद होतील. विशेष म्हणजे कुणीही न सांगता अ‍ॅपच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर अलार्म वाजतो. याचाच अर्थ शारीरिक संबंध करत असताना युजर्ला स्मार्टफोन आपल्या बाजूला ठेवावा लागेल. युजरला एक व्हर्चुअल बटन स्वाईप करुन कॅमेरा आणि मायक्रोफोनला ब्लॉक करावं लागेल. जर कुणी गुपितपणे रेकॉर्डिंगचा प्रयत्न करेल तर अ‍ॅपमध्ये एक अलार्मचं फिचर आहे जे संकटाचे संकेत देतात. तसेच हे अ‍ॅप एकाचवेळी अनेक डिव्हाईसेसला एकत्र ब्लॉक करण्यात सक्षम आहेत.

हे अ‍ॅप कुणी बनवलं?

डेवलोपर Felipe Almeida यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपला डेटाच्या गोपनीयतेला सुरक्षित ठेवण्यासाठी बनवण्यात आलं आहे. या अ‍ॅपला Billy Boy आणि Innocean Berlin यांनी मिळून बनवला आहे.

डिजीटल सुरक्षा का महत्त्वाची?

आजच्या जगात वैयक्तिक फोटो आणि व्हिडीओजचा चुकीचा वापर करणं वाढलं आहे. अशाप्रकारे वैयक्तिक फोटोजचा वापर करुन चुकीचं कृत्य करणाऱ्यांमुळे पडित व्यक्ती मानसिक तणावात जातात. तसेच पीडितांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. हा अ‍ॅप अशा घटनांना रोखण्यास मदत करतं.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...