ईएमआय फ्री लोन म्हणजे काय? दर महिन्याला हप्ता फेडण्याची चिंताच उरणार नाही
Loan EMI | या कर्जाला ईएमआय फ्री लोनही म्हटले जाते. त्यामुळे संबंधित कर्जदार आपल्या सोयीने कर्जाचे हप्ते फेडू शकतो. एखाद्या महिन्यात तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही जास्त पैसे भरू शकता.
नवी दिल्ली: आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतो तेव्हा भविष्यात त्याचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता कायम सतावत राहते. जे लोक नोकरी करत नाहीत किंवा महिन्याला ज्यांना ठराविक उत्पन्न मिळत नाही, अशी लोकांना त्यांच्यासाठी हप्ते फेडणे एकप्रकारची डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे हप्ते फेडण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे लागते. अन्यथा तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता.
त्यामुळे ज्या लोकांना व्यवसायातून एकाचवेळी पैसे मिळतात अशा लोकांना विशेष कर्ज दिले जाते. त्यामुळे त्यांना दर महिन्याला कर्जाचे हप्ते भरावे लागत नाहीत. हे लोक आपल्या सोयीने कर्जाचे हप्ते जमा करु शकतात. हप्त्याची रक्कम आणि तारीखही त्यांना स्वत:ला ठरवता येते.
काय असते ईएमआय फ्री लोन?
या कर्जाला ईएमआय फ्री लोनही म्हटले जाते. त्यामुळे संबंधित कर्जदार आपल्या सोयीने कर्जाचे हप्ते फेडू शकतो. एखाद्या महिन्यात तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही जास्त पैसे भरू शकता. या लोनचे हप्ते तुम्ही त्रैमासिक, सहामाही अशा पद्धतीने भरू शकता. हे कर्ज घेण्यासाठी तुमचा पगार किमान 30 रुपये असणे आवश्यक आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट अटींवर हे कर्ज दिले जाते.
या कर्जाचा फायदा?
ईएमआय फ्री लोनमुळे कर्जदाराला प्रत्येक महिन्याला केवळ व्याज भरावे लागते. तर दर सहा महिन्यांनी मुद्दल रक्कम फेडावी लागते. हे कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तुम्हाला केवळ व्याज भरावे लागते. तसेच तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा कर्जाच्या एकूण मुद्दलेच्या 10 टक्के पैसे (Bullet Repayment) भरता येतात.
संबंधित बातम्या: