Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund : कमी वेळेत जास्त कमाई; मनी मार्केट म्युच्युअल फंड देतो हमी, जाणून घ्या या फंडविषयी…

या फंडांमध्ये तुम्ही किमान आठवडाभरासाठीही पैसे गुंतवू शकता. पण, जोखीम किती? हे फंड तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण हमी घेत नाहीत, परंतु ते बहुधा जोखीम-मुक्त सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात

Mutual Fund : कमी वेळेत जास्त कमाई; मनी मार्केट म्युच्युअल फंड देतो हमी, जाणून घ्या या फंडविषयी...
म्युच्युअल फंडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 11:38 AM

मुंबई : हिमांशूमुंबईत राहतो. तो एक व्यावसायिक आहे. त्याच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणात रोकड येत असते. दैनंदिन कामाची गरज भासल्यानंतरही त्याच्याकडे भरपूर रोख रक्कम शिल्लक राहते. हिमांशू ही रोकड चालू आणि बचत खात्यात (saving account) टाकतो. अनेकदा हा पैसा दोन ते तीन महिने तसाच पडून राहतो. पण बिझनेसमन (businessman)असूनही हिमांशूला या पैशातून कमाई काही करता येत नाही. म्हणजे हा पैसा दोन ते तीन महिने खात्यात नुसता पडून असतो. यामुळेच हिमांशूला चुटपुट लागली आहे. मग अशा परिस्थितीत हिमांशूने काय करावे? अल्पमुदतीसाठी पैसे गुंतवून काही नफा कमावता येईल असा काही पर्याय आहे का ? त्याचबरोबर गरजेच्या वेळी हा पैसा व्यवसायातही (business) वापरता आला पाहिजे. हिमांशू आणि अशा अनेकांसाठी एक पर्याय आहे.

मनी मार्केट म्युच्युअल फंड

आता हिमांशूच्या मनात प्रश्न येत आहे की, हे मनी मार्केट म्युच्युअल फंड कोणते आहेत? खरे तर हे फंड मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये पैसे टाकतात. म्हणजेच मनी मार्केट फंड डेट प्रकारात मोडतात. या योजना अशा सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात ज्यांची जास्तीत जास्त मॅच्युरिटी 1 वर्षाची असते. हे फंड ट्रेझरी बिल्स, डिपॉझिटची प्रमाणपत्रे, कमर्शियल पेपर्स, पुनर्खरेदी करार यामध्ये पैसे गुंतवतात.

आठवडाभरासाठी गुंतवणूक शक्य

तर भाऊ या फंडात किमान आठवडाभरासाठीही गुंतवणूक करता येते. पण, जोखीम किती? हे फंड तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण हमी घेत नाहीत, परंतु ते बहुधा जोखीम-मुक्त सेक्टर मध्ये गुंतवणूक करतात

अल्पकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम

एक्झिट लोड शून्य आहे, म्हणजे फंडातून बाहेर पडताना मोठी रक्कम हाती राहते. जीसीएल सिक्युरिटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, अल्पकालीन गुंतवणुकीसाठी हे फंड उत्तम आहेत. 2-3 महिने पैसे पडून राहत असतील तर ते बँकेत ठेवण्याऐवजी तुम्ही ते मनी मार्केट फंडात टाकू शकता.

डेट फंडाचा ही पर्याय

एसआयपी’च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडी किंवा आरडीसारखा परतावा सोप्या पद्धतीने मिळेल. होय, यात एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला बँक एफडीपेक्षा कमी टॅक्स भरावा लागतो. जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, ज्या लोकांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये बाजारातील जोखीमेचा समावेश करायचा नाही त्यांच्यासाठी डेट हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी एसआयपी च्या माध्यमातून डेट फंडात गुंतवणूक करावी. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी डायनॅमिक बाँड फंड, गिल्ट फंड, कॉर्पोरेट बाँड फंड आदी बाबी एसआयपीच्या माध्यमातून उत्तम पर्याय ठरू शकतात.

इतर बातम्या

Tata Motors cars: मार्चमध्ये टाटाच्या 42000 गाड्यांची विक्री, जाणून घ्या देशातल्या टॉप 5 कार

Pune | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांबाबत वापर होणार बंद ; कारण काय?

Pandharpur : गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.