सोन्याला खेळू द्या डाबडुबली! तुम्ही रहा निवांत, कारण व्याज मिळेल एकाच दामात, कसं? जाणून घ्या

सॉवरेन गोल्ड बाँडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचे व्याजदर. सॉवरेन गोल्ड बाँडवर तुम्हाला निश्चित व्याज मिळते.

सोन्याला खेळू द्या डाबडुबली! तुम्ही रहा निवांत, कारण व्याज मिळेल एकाच दामात, कसं? जाणून घ्या
सोन्यात गुंतवणूक कशी करावी?Image Credit source: wallpaperflare.com
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 8:41 AM

सोने (Gold) सध्या डाबडुबली खेळत आहे. एका दरावरुन दुस-या दरावर सोने उडी मारत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कमी जास्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती (Crude Oil Price) वाढल्याने देशातंर्गत किंमती भडकल्या आहेत. तर रुपयांमध्ये पण कमालीचे स्थित्यंतर येत आहे. रुपयाची घसरगुंडी (Rupees Downfall) उडाली आहे. सोन्याचे भावही गगनाला भिडले आहे. सोने पुन्हा 50 हजाराच्या मागे-पुढे खेळत आहे. सध्या सोन्याच्या भावाला झळाळी आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा आलेख चढा असला तरी ते केव्हा झरकन खाली येईल, ते सांगता येत नाही. याचा अर्थ तुम्ही चढ्या दराने सोने खरेदी कराल, परंतू ते दाबून आपटल्यास तुमची फसगत होऊ शकते. तेव्हा सोन्यासारखा धोका तुम्हाला परवडणार आहे का? मग अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग कोणता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. निश्चित उत्पन्न प्राप्त करण्याचे साधन कोणते, या प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) हा आहे. तर चला जाणून घेऊयात या गोल्ड बॉंड विषयी…

सोने कमाईचे उत्तम साधन असले तरी ते चोरी होण्याचे, ते घरात सुरक्षित ठेवण्याच्या अनेक समस्या आहेत. सोन्याचे दाग-दागिने, बिस्किट, विट अथवा इतर प्रकार घरात ठेवण्याचे धोकेही तेवढेच आहे. त्यामुळे तुमच्या जीवाला घोरही लागलेला असतो. परंतू या समस्यापासून वाचण्यासाठी आणि एक निश्चित फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय समोर येतो. भाव पडले अथवा वाढले तरी एक निश्चित रक्कम तुम्हाला फायदा देते. या बाँडच्या व्याजदरावर त्याचा काहीऐक परिणाम होत नाही. सरकार तुम्हाला एक निश्चित व्याजदर अदा करण्याचे वचन या बाँडच्या माध्यमातून देते आणि ते वचन पाळते ही. ज्या व्याजदरावर तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात केली, त्याच दराने तुम्हाला त्याचा फायदा मिळत राहतो.

पाहा Video : महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

या गुंतवणुकीचा काय बरं फायदा ?

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. सॉवरेन गोल्ड बाँड एक निश्चित व्याज देणारी योजना आहे. बाजारभावाचा त्याच्यावर काडीमात्र परिणाम होत नाही. याचा अर्थ बाजारातील भाव कमी अथवा जास्त होऊ देत, तुम्हाला मिळणा-या व्याजात तसूभरही फरक पडणार नाही. तुम्हाला ठरलेल्या व्याजदराने परतावा मिळत राहील. सरकार तुम्हाला गोल्ड बाँडवर सध्या 2.5 टक्क्यांनी व्याज देत आहे. व्याजाची रक्कम वर्षभरात दोन भागात विभागल्या जाते आणि सहा महिन्यांनी ती खात्यात जमा करण्यात येते. या योजनेत निश्चित व्याजदर मिळण्याची हमी देण्यात आली आहे. मूळ रक्कम आणि त्यावरील व्याजावर सरकार सॉवरेन हमी देते.

हा गोल्ड बाँड करा असा खरेदी

  1. एसीबीआयच्या ऑनलाईन बँकिगच्या माध्यमातून तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करु शकता.
  2. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर जा.
  3. नेट बँकिंग खात्यात प्रवेशासाठी लॉग-इन आयडी आणि पासवर्ड टाका.
  4. ई-सर्व्हिस हा पर्याय निवडा.
  5. त्याअंतर्गत सॉवरेन गोल्ड बाँड हा पर्याय निवडा.
  6. अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा
  7. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोसीड या बटनावर क्लिक करा
  8. रजिस्ट्रेशन अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
  9. खरेदी करण्याचा अर्ज उघडेल, त्यात वारसदाराचे नाव, किती सोने खरेदी करायचे याची माहिती भरा
  10. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.