स्टॉक स्प्लिटने गुंतवणुकदार मालामाल; अ‍ॅमेझॉनचे खास गिफ्ट

खूप कष्ट घ्या, मौज करा आणि इतिहास बनवा या टॅगलाईनसह अ‍ॅमेझॉनने ग्राहकांना खास गिफ्ट दिले आहे. अ‍ॅमेझॉनने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची बल्ले-बल्ले होणार आहे.

स्टॉक स्प्लिटने गुंतवणुकदार मालामाल; अ‍ॅमेझॉनचे खास गिफ्ट
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 8:54 AM

अ‍ॅमेझॉनच्या संचालक मंडळाने (Amazon Board of Director) बुधवारी 20-1 अशा स्वरुपात स्टॉक स्प्लिटची (Stock Split) घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल पहायला मिळाली. अर्थात या निर्णयामुळे गुंतवणुकदारांचा मोठा फायदा होणार आहे. त्यांनी केलेली गुंतवणूक काही अंशी वाढणार आहे. एकप्रकारे हा बोनसच आहे. तर मंडळी हे स्टॉक स्प्लिट काय भानगड आहे ती जाणून घेऊयात. भारतासह जगभरातील कंपन्या वेळोवेळी स्टॉक स्प्लिटची घोषणा करतात. स्टॉक स्प्लिटमुळे कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढल्याची नोंद आहे. मोठ्या कंपन्यांचे गुंतवणुकदार(Investors) अशा संधीच्या शोधात आणि प्रतिक्षेत असतात. कारण त्यांची गुंंतवणूक अनायसे वाढते. शेअरच्या मोबदल्यात शेअर त्यांना मिळतो. म्हणजे गुंतवणूक न करताच पदरात शेअरचे दान पडते. स्टॉक स्प्लिटमुळे जसा गुंतवणुकदारांचा फायदा होतो तसा कंपन्यांचा काय फायदा होतो, हे जाणून घेऊयात.

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?

स्टॉक स्प्लिट या नावावरुनच तुम्ही अंदाज बांधू शकता की ही असते शेअरची विभागणी. या प्रक्रियेत कंपनी त्यांचा शेअर हा छोट्या छोट्या फेस व्हॅल्यूत विभागून देते. यामुळे स्टॉक्सची संख्या वाढते, तरीही त्याच्या मूल्यात कसला ही फरक पडत नाही. मात्र एका स्टॉक्सचे अनेक स्टॉक्स होत असताना गुंतवणुकदाराचा फायदा होतो, तसाच कंपनीचाही फायदा होतो. कारण कंपनीच्या शेअरची किंमत अनेकदा वाढते. त्यावर गुंतवणुकदारांच्या उड्या पडतात. गुंतवणुकीसाठी कंपनीवर विश्वास वाढतो. ही प्रक्रिया इतकी जलद असते की कंपनी ही मालामाल होते. कधी कधी शेअरची किंमत अचानक इतकी मोठी होते की सर्वसामान्य गुंतवणुकदार दुरुनच हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवतो आणि वेळेत या स्टॉकमध्ये गुंतवणूक न केल्याचे शल्य त्याला अस्वस्थ करते. अशावेळी स्टॉक स्प्लिटच्या माध्यमातून या सर्वसामान्य गुंतवणुकदारांना कंपनी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करुन देते.

फायदा काय होतो

शेअर स्प्लिटमुळे कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. स्टॉक ट्रेडिग ट्रेंडमध्ये येतो. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांना कंपनीत गुंतवणुकीची संधी मिळते. तर जून्या गुंतवणुकादारांच्या स्टॉकची संख्या वाढते. तो फायदा त्यांना होतो. कंपनी पुन्हा गुंतवणुकदारांच्या लाटेवर स्वार होते. ती मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदारांपर्यंत पुन्हा पोहचते. नवीन गुंतवणुकदारांना कमी किंमतीत स्टॉक उपलब्ध होत असल्याने त्यांच्या पोर्टफोलिओत एक तगडा स्टॉक जोडल्या जातो. जुन्या गुंतवणुकदारांना स्प्लिटमुळे त्यांच्या शेअरची संख्या वाढून मिळते. त्यात त्यांना नफा कमावण्याची आयती संधी उपलब्ध होते. वाढलेल्या शेअर्सपैकी काही शेअर विकून गुंतवणुकदारांना नफा कमावण्याची संधी मिळते.

संबंधित बातम्या

…तर खतांचे दर गगनाला भिडणार; भारतालाही बसणार मोठा फटका?

EPF वर व्याजदर किती मिळेल? या आठवड्यात होणार निर्णय

बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.