ITR : आयटीआर 1 आणि आयटीआर 2 मधील अंतर समजून घ्या, नाहीतर नोटीससाठी रहा तयार

ITR : तुमच्या कमाईवर कर भरण्याची वेळ आली आहे. पण फाईलिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

ITR : आयटीआर 1 आणि आयटीआर 2 मधील अंतर समजून घ्या, नाहीतर नोटीससाठी रहा तयार
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 6:56 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न फाईल ( ITR) करण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण प्राप्तिकर (Income Tax) भरताना एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे प्राप्तिकर रिटर्न फाईल करताना योग्य अर्जाची निवड करणे आवश्यक आहे. आयटीआर भरण्यासाठी अनेक फॉर्म ई-फाईलिंग पोर्टलवर (e filling Portal) उपलब्ध आहेत. त्यातील एक अर्जाची निवड करुन, योग्य त्या तपशीलासह अर्ज जमा करावा. मुदतीच्या आता आयटीआर जमा करणे आवश्यक आहे.

तुम्ही रिटर्न फाईल करत असाल तर आयटीआर 1 अथवा आयटीआर 2 या अर्जांमधील फरक समजून घ्या. या दोन प्राप्तिकर रिटर्न अर्जात अंतर आहे. त्यामुळे चुकून तुम्ही चुकीचा अर्ज भरल्यास, त्याला दोषयुक्त रिटर्न मानण्यात येईल. आयकर विभाग त्यासाठी तुम्हाला नोटीसही पाठवेल. या नोटीसमध्ये तुम्हाला योग्य रिटर्न फॉर्म जमा करण्यास सांगण्यात येईल.

तर पहिला अर्ज, ITR-1 कोण भरु शकतो? व्यक्ती भारतीय नागरिक असावा. त्याचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. त्याच्याकडी स्थावर मालमत्ता, इतर कमाईचे स्त्रोत हवेत. त्याला शेतीतून 5000 रुपयांचे उत्पन्न हवे. यापैकी एकाही अटीची पुर्तता करत नसाल तर आयटीआर फाईल करण्यासाठी तु्म्ही पात्र ठरणार नाही.

हे सुद्धा वाचा

मग ITR-2 कोण जमा करु शकते, हे पाहुयात. या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर काही स्त्रोत असतील तर आयटीआर -2 अर्ज जमा करता येतो. आयटीआर -2 अर्ज फाईल करण्यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, पगारातून उत्पन्न, एक वा त्यापेक्षा अधिकचे संपत्तीचे, उत्पन्नाचे स्त्रोत असतील तर आयटीआर 2 फाईल करता येईल. परदेशी स्त्रोतातून अर्थात परदेशी शेअर, त्याचा लाभांश इत्यादी प्रकरणात आयटीआर 2 फाईल करता येईल.

असूचीबद्ध इक्विटी शेअर्समधील गुंतवणूकदार, देशाबाहेर संपत्ती असेल, 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांना ITR-2 दाखल करता येईल. जर एखाद्या व्यक्तीची व्यवसायातून कमाई होत असेल तर त्याला ITR-1 अथवा ITR-2 वापर करता येणार नाही. त्याच्यासाठी वेगळा ITR फॉर्म आहे. त्याचा वापर करता येईल.

ITR-1 च्या तुलनेत ITR-2 हे किचकट आणि कठिण आहे. ITR-1 भरण्यास अत्यंत सोपे आहे. हा एक सामान्य आयटीआर अर्ज आहे. तर ITR-2 अर्ज किचकट आहे. त्याला भरायला वेळ लागतो. यामध्ये अधिक तपशील जमा करावा लागतो.

एखादा व्यक्ती नवीन आयकर पोर्टलवर आयटीआर 1 उपयोग करुन सोप्या पद्धतीने त्याचे टॅक्स रिटर्न भरु शकतो. ITR-1 अर्जात महत्वपूर्ण माहिती, तपशील अगोदरच भरलेला असतो. तर नवीन आयकर पोर्टलवर आयटीआर-2 दाखल करणे अत्यंत कठीण आहे. हा अर्ज भरताना तुम्हाला शेअर, म्युच्युअल फंड आदींच्या खरेदीची तारीख, युनिटचे विवरण हा तपशील द्यावा लागतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.