जाणून घ्या प्लॉट लोन आणि होम लोनमध्ये काय फरक असतो?
Plot Loan | रहिवाशी इमारतींमध्ये फ्लॅट विकत घेत असाल तर तुम्हाला होम लोन मिळते. तर प्लॉट विकत घेण्यासाठी वेगळ्याप्रकारचे कर्ज मिळते. ही जमीन रहिवाशी मालमत्ता असल्याचे पुरावे दिल्यानंतरच तुम्हाला प्लॉट लोन दिले जाते.
नवी दिल्ली: स्वत:च्या मालकीचं घर असणं, हे अनेकांच्या आयुष्यातील प्रमुख स्वप्न असतं. काही लोक इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतात. तर काहीजण प्लॉट खरेदी करुन त्यावर घर बांधतात. या दोन्ही गोष्टी वरकरणी सारख्याच वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्यामध्ये बरेच फरक आहेत.
रहिवाशी इमारतींमध्ये फ्लॅट विकत घेत असाल तर तुम्हाला होम लोन मिळते. तर प्लॉट विकत घेण्यासाठी वेगळ्याप्रकारचे कर्ज मिळते. ही जमीन रहिवाशी मालमत्ता असल्याचे पुरावे दिल्यानंतरच तुम्हाला प्लॉट लोन दिले जाते. होम लोनप्रमाणे बहुतांशा बँका प्लॉट लोनही देतात. मात्र, त्यासाठी काही अटीशर्ती घालून देण्यात आल्या आहेत.
अनेक बँका देशातील विशिष्ट भागातच प्लॉट लोन देतात. प्लॉट लोन मिळाल्यानंतर त्या जमिनीवर 18 महिन्यांच्या आतमध्ये बांधकाम सुरु झाले पाहिजे. कर्जाच्या करारनाम्यात तशी अट नमूद केलेली असते. घराचे बांधकाम सुरु असताना बँकेला त्याचे फोटो पाठवावे लागतात. घराचे बांधकाम 18 महिन्यात सुरु झाले नाही तर बँक कर्जाची रक्कम परत मागू शकते.
प्लॉट लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
प्लॉट लोन देताना लोन टू व्हॅल्यू’ LTV रेश्यो पाहिला जातो. होम लोनमध्ये ग्राहकाला अगदी 90 टक्क्यांपर्यंतही कर्ज मिळते. कारण बँकेकडे त्याच्या घराची हमी असते. मात्र, प्लॉट लोनमध्ये तसा प्रकार नसल्याने बँकेकडून जोखीम कमी करण्यासाठी फक्त 65 ते 75 टक्केच कर्ज दिले जाते. प्लॉट खरेदीसाठी 40 लाखांची गरज असेल तर बँक तुम्हाला फक्त 26 ते 30 लाखांपर्यंत कर्ज देईल.
तसेच ग्रामीण भागातील प्लॉटसाठी कर्ज मिळत नाही. औद्योगिक क्षेत्रातील जमिनीसाठीही प्लॉट लोन मिळत नाही. तुम्ही प्लॉट लोन घेऊन त्या जमिनीवर शेती करु शकत नाही. तसेच त्या जमिनीवर कमर्शियल कन्स्ट्रक्शनही करता येणार नाही.
संबंधित बातम्या:
SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा
Home Loan : कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज? जाणून घ्या व्याजदर