RBI News on 2000 Note : चार महिन्यांत तर बदलता येतील 26 लाख, मग अधिक रक्कमेचं करु काय

RBI News on 2000 Note : चार महिन्यांत साधारणतः 26 लाख रुपये बदलता येतील. पण त्यापुढील रक्कमेचं काय करायचं असा प्रश्न काही जणांना पडला आहे...

RBI News on 2000 Note : चार महिन्यांत तर बदलता येतील 26 लाख, मग अधिक रक्कमेचं करु काय
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 4:37 PM

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पण 2000 रुपयांची गुलाबी नोट असेल तर ती लवकरात लवकर बँकेतून बदलून घ्या. नोट जमा करुन तुम्हाला 100, 200, 500 रुपये त्या बदल्यात घेता येतील. अथवा तुमच्या खात्यात जरी ही रक्कम जमा केली तर चालते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही नोट वैध आहे. 30 सप्टेंबरनंतर ही नोट चलनातून बाद होईल. या गुलाबी नोटा (2000 Rupees Note) बाजारातून अचानक गायब झाल्या होत्या. त्यांचा गैरवापर होत असल्याचा संशय केंद्र सरकारला होता. तसेच नकली नोटांचा पण सुळसुळाट वाढला होता. परिणामी या नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर करण्यात आला. आता मोठ्या प्रमाणात पुन्हा काळेधन बाहेर पडण्याची शक्यता आहे.

एकावेळी इतके रुपये करता येतील जमा बँकेत एकावेळी तुम्ही 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयापर्यंतची रोख रक्कम जमा करु शकता. बँक या नोटांच्या बदल्यात तुम्हाला दुसरे चलन देईल. 23 मे 2023 पासून बँकामध्ये जाऊन तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलता येईल. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा जमा करता येतील.

127 दिवसांत बदला 26 लाख आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ही मर्यादा एका दिवशी 20 हजार रुपायांपर्यंत आहे. म्हणजे 127 दिवसांमध्ये नागरिकांना 25,40,000 रुपये जमा करता येतील.

हे सुद्धा वाचा

बँकासमोर पुन्हा लांब रांग ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटा आहेत. ते नागरिक या नोटा बँकेत जाऊन जमा करु शकतील. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली होती. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या. त्या बदलण्यासाठी बँकासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यावेळी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. पण यावेळी तशी परिस्थितीत राहणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईलच. पण यापूर्वी इतकी अडचण येणार नाही.

बँक खात्याचे केवायसी करुन घ्या जर तुमच्याकडे 26 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असेल तर मग तुमच्याकडील बँक खात्याचे केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे. जर केवायसी अपडेट नसेल तर त्वरीत करुन घ्या. तुमच्या खात्यात तुम्ही किती पण पैसा जमा करु शकता. बँकेच्या नियमानुसार, जी रक्कम जमा करता येऊ शकते, तितकी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. पण भलीमोठी रक्कम जमा करताना, ही रक्कम कोणत्या माध्यमातून तुमच्याकडे आली. तिचा उत्पन्नाचा स्त्रोत काय याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. ज्यांच्याकडे बँकेचे खाते नाही. त्यांना 26 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बदलता येणार नाही.

काळा पैसा पुन्हा येईल बाहेर आरबीआयच्या माहितीनुसार, सर्व बँकांकडून 23 मे 2023 रोजीपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा परत घेण्यात येतील. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरु होईल. पुढील 127 दिवस ही प्रक्रिया सुरु असेल. ही गुलाबी नोट एटीएममधून तर कधीचीच बाद झाली आहे. आता व्यवहारातून पण ही रक्कम बाद होणार असल्याने काळा पैसा बाहेर येईल, अशी आशा आरबीआयला वाटत आहे. गेल्या नोट बंदीवेळी अनेक ठिकाणी बाद नोटा जाळण्याचे प्रकार घडले होते. तसेच बंद झालेल्या नोटांचे बंडल उघड्यावर, नद्यांमध्ये टाकलेले आढळले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.