AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voter ID : मतदान ओळखपत्र हरवलंय ? चिंता नको, घर बसल्या वोटर कार्ड मिळण्याच्या या आहेत टिप्स

Voter ID News : जर तुमचे मतदान ओळखपत्र हरवलं असेल वा फाटले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला नवीन मतदान कार्ड कसे मिळवता येईल याची माहिती घेऊयात

Voter ID : मतदान ओळखपत्र हरवलंय ? चिंता नको, घर बसल्या वोटर कार्ड मिळण्याच्या या आहेत टिप्स
मतदान ओळखपत्र पुन्हा मिळवाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 7:10 PM

Voter ID Recover : मतदान ओळखपत्र हा तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठीचा गेट पास (Gate Pass) आहे. ओळखपत्र असेल तर तुम्हाला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल. तुमच्या आवडत्या पक्षाच्या उमेदवाराला (Candidate) मतदान करता येईल. एवढंच नव्हे तर एकही उमेदवार तुमच्या पसंतीस उतरला नसेल तर तुम्हाला नोटाचा पर्याय (NOTA Option) ही वापरता येते. पण एखाद्यावेळी हा गेटपासच जर हरवला तर ? अथवा तुमचे मतदान ओळखपत्रच फाटले, गहाळ झाले अथवा अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवले की त्याचा तुम्हाला विसर पडला. अशावेळी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ओळखपत्र परत कसे मिळवावे हा प्रश्न समोर उभा राहतो. मतदान ओळखपत्राशिवाय तुम्हाला काही महत्वाची कामे पूर्ण करता येत नाहीत. पण निराश होऊ नका, तुम्हाला तुमचे ओळखपत्र कसे मिळवावे हे आता आम्ही सांगणार आहोत. पद्धत अत्यंत सोपी आहे. त्याद्वारे तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र (Voter ID) परत मिळवता येईल.

वोटर हेल्पलाईनचा वापर

मतदान ओळखपत्र परत मिळवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरला जावे लागेल. वोटर हेल्पलाईन अप्लिकेशन डाऊनलोड (Download Voter Helpline App) करावे लागेल. हे अप्लिकेशन निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप आहे. त्याचा वापर मतदाराला नोंदणी आणि निवडणुकीसंबंधीच्या प्रक्रियेसाठी वापरता येईल. जर नागरिकाला त्याचे वोटर आईडी बदलायचे असेल तर त्याला अॅपची मदत घेता येते. या अॅपच्या माध्यमातून त्याला निवडणूक ओळखपत्र मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रक्रिया

  • निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन अॅप्लिकेशन डाऊनलोड करा
  • अॅपमध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट ऑफ वोटर आयडी कार्ड संबंधीचा अर्ज क्रमांक 1 मिळेल
  • या अर्जात तुम्हाला काही अत्यावश्यक माहिती जमा करावी लागेल यामध्ये मोबाईल क्रमांकाची माहिती द्यावी लागेल
  • त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी हा पर्याय निवडावा लागेल
  • ओटीपी संबंधित ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल
  • त्यानंतर दोन पर्याय समोर येतील
  • जर तुम्हाला तुमचा वोटर आईडी कार्ड क्रमांक माहिती असेल तर Yes वर क्लिक करा
  • जर तुम्हाला वोटर आईडी कार्ड क्रमांक माहिती नसेल तर NO वर क्लिक करा
  • वोटर कार्डचा क्रमांक माहिती नसेल तर तुम्हाला बेसिक माहिती जमा करावी लागेल
  • यामध्ये तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, लिंग, पत्ता आदी माहिती जमा करावी लागेल
  • त्यानंतर वोटर आईडी बदलण्याचे कारण तुम्हाला नमूद करावे लागेल
  • तुम्हाला एक घोषणापत्र भरुन द्यावे लागेल. त्यात तुमचे नाव आणि पत्ता भरुन द्यावा लागेल
  • तुम्हाला रेफ्ररन्स आयडी देण्यात येईल आणि आयडी कार्ड घरपोच येईल
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.