टाईट सिक्योरिटीनंतर कसे होते व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक, या तीन चुका ठरतात महाग
whatsapp hacking: व्हॉट्सअॅप सुरक्षित अॅप आहे तर हॅक कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु आपल्या काही चुकांमुळे सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सअॅप हॅक करण्याची संधी मिळते. यामुळे व्हॉट्सअॅप वापरताना या चुका कधीही करु नये. या चुकांमुळेच तुमचा फोन हॅक होतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता. हॅकरने त्यांच्याकडून 400 डॉलरची मागणी केली होती. तसेच सतत त्याच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार सुप्रिया सुळे यांनी केली होती. व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचे आवश्यक भागच बनला आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाकडे हे अॅप आहे. आता अनेक जण व्हॉट्सअॅप खाते हॅक झाल्याची तक्रारी करु लागले आहे.
व्हॉट्सअॅप सुरक्षित अॅप आहे तर हॅक कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु आपल्या काही चुकांमुळे सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सअॅप हॅक करण्याची संधी मिळते. यामुळे व्हॉट्सअॅप वापरताना या चुका कधीही करु नये. या चुकांमुळेच तुमचा फोन हॅक होतो.
-
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन
आपल्या व्हॉट्सअॅपमध्ये नेहमी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु ठेवा. त्यामुळे सिक्योरिटी वाढते. त्यासाठी तुम्हाला एक पिन सेट करावी लागते. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु राहिल्यानंतर कधीकधी व्हॉट्सअॅपकडून ही पिन टाकण्याचा संदेश येतो. तुम्ही पिन कोणासोबत शेअर करु नका. नाहीतर व्हॉट्सअॅप हॅक होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
-
रजिस्ट्रेशन कोड शेअर करु नका
व्हॉट्सअॅप जेव्हा सुरु असते तेव्हा लिंक्ड डिव्हाईससाठी रजिस्ट्रेशन कोड येतो. तुमच्याकडून कोणी हा रजिस्ट्रेशन कोड मिळवला तर तुमच्या व्हॉट्सअॅपच्या संपूर्ण अॅक्सेस त्याला मिळेल. हा रजिस्ट्रेशन कोड वापरुन तो कोणालाही मेसेज पाठवू शकतो. त्यामुळे हा रजिस्ट्रेशन कोडही कधी शेअर करु नका.
-
अनोळखी लिंकवर क्लिक करु नका
व्हॉट्सअॅप हॅक होण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. तुम्हाला जर मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून लिंक मिळाली, तुम्ही चुकीने त्या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. कोणाकडे तुमच्या फोनचा अॅक्सेस गेल्यावर व्हॉट्सअॅप सहज हॅक होऊ शकतो.