WhatsApp : इंटरनेट बंद तरी व्हॉट्सअपवरुन पाठवा मॅसेज, मेटा कंपनीचा युझर्ससाठी मेगा प्लॅन

WhatsApp : इंटरनेटवर बंदी असली तरी व्हॉट्सअप मधून मॅसेज पाठविता येतील.

WhatsApp : इंटरनेट बंद तरी व्हॉट्सअपवरुन पाठवा मॅसेज, मेटा कंपनीचा युझर्ससाठी मेगा प्लॅन
Viral News : निवृत्त अधिकाऱ्याने व्हिडिओ कॉल उचलला, तरुणीचं अश्लील कृत्य, चार लाख घेतले, तरी सुध्दा म्हणते...
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 8:40 PM

नवी दिल्ली : व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी (WhatsApp Users) चांगली बातमी आहे. अनेक देशात तिथल्या सरकारची सेन्सॉरशिप (Government Censorship) लागू होते. इंटरनेटवर बंदीचे (Internet Ban) नियम, कायदे लागू होतात. त्याचा फटका युझर्संना बसतो. पण त्यावर व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाने जालीम उपाय शोधला आहे. मेटा कंपनीने (Meta Company) जगभरात प्रॉक्सी सर्व्हरच्या (Proxy Server) मदतीचा घोषणा केली आहे. या सपोर्ट सिस्टममुळे कोणत्याही भागातून युझर्सला व्हॉट्सअपवरुन मॅसेज पाठविता येणार आहे. या सुविधेमुळे बंदी असतानाही वापरकर्त्यांना संदेश पाठविता येईल.

एखाद्या देशातील सरकारने विशिष्ट परिसरात व्हॉट्सअपची सेवा बंद (Government Blocks the App ) केली अथवा इंटरनेट सेवा प्रभावित झाली तर अशावेळी सपोर्ट सिस्टिम कामाला येणार. सेवा बंद झाल्यावर युझर्सला व्हॉट्सअपवरुन मॅसेज पाठविता येईल. मेटा कंपनीने एका ब्लॉगच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे.

मेटाने त्यांच्या या मेगा प्रकल्पाविषयीची माहिती दिली. त्यानुसार, कंपनी जगभरातील व्हॉट्सअप युझर्ससाठी प्रॉक्सी सर्व्हर सुरु करत आहे. यामुळे इंटरनेट सेन्सॉरशिप, इंटरनेट शटडाऊन, अथवा व्हॉट्सअपवरील बंदी काळात मॅसेजिंग सेवा सुरु राहतील.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे या नवीन सुविधेत ग्राहकांची गुपोनियता कुठेही भंग होणार नसल्याचा दावा मेटाने केला आहे. प्रॉक्सी सर्व्हर असतानाही युझर्सला सर्व सुरक्षा मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. याकाळात युझर्सची पर्सनल चॅटींग एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचरमुळे त्याची गोपनियता कायम राहिल.

नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी अनेक देशांमध्ये इंटरनेट सेवा प्रभावित करण्यात येते. तसेच सोशल मीडियावरही सरकार अंकुश ठेवते. सेन्सारशिपमुळे नागरिकांना त्यांचा भावना पोहचविता येत नाही. अशावेळी मेटाची नवीन सुविधा फायदेशीर ठरु शकते.

2016 पासून आतापर्यंत जगभरातील एकूण 74 देशांमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प आहे. या देशात अथवा काही परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचा जगाशी व्हर्च्युअल संबंध पूर्णपणे बंद आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.