Home Loan : दोन गृह कर्जाचे कशाला वाहता ओझे, खाते असे करा एकत्र, पैसे तर वाचतीलच टेन्शन होईल कमी

Home Loan : दोन गृहकर्जाचा ताण कशाला घेता. दोन्ही खाते एकत्र केल्यास तुमची मोठी अडचण दूर होईल. दोन होम लोनमुळे होणारे नुकसान तर टळेलच पण पैशांची बचत होईल. कशी आहे प्रक्रिया

Home Loan : दोन गृह कर्जाचे कशाला वाहता ओझे, खाते असे करा एकत्र, पैसे तर वाचतीलच टेन्शन होईल कमी
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 5:07 PM

नवी दिल्ली : एकाहून अधिक गृहकर्ज (Home Loan) असणे ही फार मोठी गोष्ट नाही. अनेक लोक दोन दोन गृहकर्ज घेतात. पण एकापेक्षा अधिक गृहकर्जाचे ओझे सांभाळणे सोपे काम नाही. हे काम अत्यंत कठिण आहे. वेळेत दोन्ही कर्जांची परतफेड करण्यासाठी आर्थिक शिस्त आणि अलर्ट असणे आवश्यक आहे. किती लाखांचे कर्ज आहे, त्याच्या परतफेडीचा कालावधी (Return Tenure) किती आहे. कितीचा हप्ता भरावा लागतो. त्याची तारीख काय ही सर्व कवायत दरमहा करावी लागते. कधी कधी अनावश्यक खर्चामुळे खात्यात शिल्लक रक्कम राहत नाही, अशावेळी दंड भरावा लागतो. दरमहा या चक्रव्युहात अडकण्यापेक्षा या कटकटीपासून मुक्त होता येते. दोन्ही खाते एकत्र केल्यास तुमची मोठी अडचण दूर होईल. दोन होम लोनमुळे होणारे नुकसान तर टळेलच पण पैशांची बचत होईल. कशी आहे प्रक्रिया

तर एकच करा खाते तुम्ही दोन गृहकर्ज घेतले असेल तर त्याला एकत्र करता येईल. दोन गृहकर्ज एकाच खात्यात बदलविण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे कर्जाचे व्यवस्थापन करण्यात अडचण येत नाही. तसेच व्याजदर कमी होतो. दोन ठिकाणी व्याज भरावे लागत नाही. इतर खर्चात बचत होऊ शकते. जर तुम्ही दोन गृहकर्ज एकाच खात्यात बदलवू इच्छित असाल तर लोन कंन्सोलिडेशन हा पर्याय निवडू शकता.

असे करता येईल एकत्र तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफर पर्याय निवडू शकता. सिंगल कन्सोलिडेट करु शकता. त्यासाठी तुम्हाला एक फायद्याची गोष्ट करावी लागेल. जी बँक, वित्तीय संस्था दोन खाते एकत्र करताना कमी व्याजदर आकारेल, ती तुम्हाला निवडता येईल. अनेक बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आणि वित्तीय क्षमता पाहून ही सुविधा देते. कर्ज हस्तांतरीत करण्यासाठी सध्याच्या बँकेची परवानगी लागेल. तुमची नवीन बँक जुन्या बँकेला उर्वरीत रक्कम देईल. तसेच एकत्रित कर्जाची रक्कम मंजूर करेल. त्यावर नवीन व्याजदर आकारेल.

हे सुद्धा वाचा

लोन टॉप-अप दोन होम लोन एकत्र करण्याची आणखी एक पद्धत आहे. तुम्हाला एक गृहकर्ज टॉपअप लोन घेऊन चुकते करावे लागेल. त्यामुळे एक घर कर्जमुक्त होईल. पण त्यासाठी बँकेने तुम्हाला अधिक टॉप-लोन देणे आवश्यक आहे. किंवा गाठीशी काही रक्कम असेल तर टॉपअपच्या मदतीने पण तुम्ही एका घरावरील कर्ज उतरवू शकता. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. दीर्घकाळासाठी व्याजापोटी मोठी रक्कम खर्ची घालण्यापेक्षा एक घर कर्जमुक्त करुन फायदा मिळवता येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.