Aadhaar Card : युपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिटकार्ड कशाला? Aadhaar चा मिळेल आधार!

Aadhaar Card : आता तुम्हाला युपीआयचा पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्ड जवळ बाळगण्याची झंझट उरली नाही. तुम्ही आधार कार्डच्या आधारेच युपीआयचा पिन सेट करु शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने..

Aadhaar Card : युपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिटकार्ड कशाला? Aadhaar चा मिळेल आधार!
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 11:04 AM

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. भारतीय नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डच्या 12 विशिष्ट अंकांची मदत मिळते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार अपडेट करण्यासाठी वेळोवेळी सूचना देते. त्याआधारे नागरिकांना शुल्क (Fees) अथवा विनाशुल्क आधार कार्ड अपडेट करता येते. बँक खाते, पॅनकार्ड, रेल्वेचा प्रवास वा इतर ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते. एकच ओळखपत्र भारतीयांना अनेक ठिकाणी वापरता येते. त्यामाध्यमातून नागरिकांना विविध सोयी-सुविधा घेता येतात.  शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठीही आधारकार्ड महत्वाचा ओळखीचा पुरावा आहे.

अनेक नागरिकांना हे माहिती नाही की, आधार कार्ड सोबत वागविण्याची, बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यांना मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करुन ठेवता येते. अथवा ई-मेलला ड्राफ्टमध्ये आधार कार्ड सेव्ह करता येते. आता युपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही. आता आधार कार्डच्या मदतीने ही तुम्ही युपीआयचा पिन सेट (UPI PIN Set) करु शकता.

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस वा युपीआय सध्या देशात सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट पद्धत आहे. या डिजिटल पेमेंट प्रणालीने देशात डिजिटल व्यवहार अत्यंत सोपा आणि वेगवान झाला आहे. अवघ्या काही सेकंदात समोरील व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत होत असल्याने नागरिकांच्या या प्रणालीवर उड्या पडल्या आहेत. कोविड काळात ही पेमेंट पद्धत सर्वाधिक लोकप्रिय झाली होती.

हे सुद्धा वाचा

रोखीत व्यवहाराची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने युपीआय व्यवहार पद्धत विकसीत केली आहे. अगदी गल्लीबोळातील दुकानदारांपासून, रस्त्यावरील सामान विक्री करण्यापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय हॉटेलपर्यंत युपीआय कोडच्या माध्यमातून दररोज कोट्यवधींची उलाढाल देशात सुरु आहे. व्यवहार करण्यास अत्यंत सोपा आणि विश्वासहार्य असल्याने नागरिक आता याच प्रणालीचा वापर करत आहेत.

युपीआय आयडी सेट (UPI ID Set) करण्यासाठी तुमच्याकडे एक बँक खाते, या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. ग्राहकांकडे डेबिट कार्ड नसेल तर ते युपीआय आयडी आधार कार्डसोबत लिंक करु शकतात. आधार ओटीपी (Aadhar OTP ) एक सुरक्षित मार्ग मोकळा करुन देते. आधार ओटीपीच्या माध्यमातून वापरकर्त्याला त्याचा युपीआय पिन पण बदलता येतो. आधारच्या मदतीने ग्राहकाला नवीन युपीआय पिनही सेट करता येतो.

युपीआय पिन सेट करण्यासाठी ही आहे पद्धत

  1. सर्वात अगोदर ओटीपी प्रमाणीकरणासाठी त्यासाठीचा पर्याय निवडा.
  2. तुमच्या आधारकार्डचा सर्व तपशील नोंदवा आणि पुन्हा प्रमाणित करा.
  3. यानंतर बँकेकडून ओटीपीसह युआयडीएआयकडून आलेला ओटीपी नोंदवा.
  4. त्यानंतर नवीन युपीआय पिन सेट करा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.