AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Ticket : रेल्वेत भाऊगर्दी असतानाही वेटिंग तिकिटाची गरज काय, रेल्वेचा रिझर्व्हेशन फंडा समजून घ्या

Railway Ticket : रेल्वेमध्ये भाऊगर्दी असतानाही वेटिंग तिकिटाची गरज का बरं पडत असेल, रेल्वे आरक्षणाचे गणित तर समजून घ्या..

Railway Ticket : रेल्वेत भाऊगर्दी असतानाही वेटिंग तिकिटाची गरज काय, रेल्वेचा रिझर्व्हेशन फंडा समजून घ्या
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:48 AM

नवी दिल्ली : सुट्या, सण, उत्सवाला रेल्वेतून प्रवास (Railway Journey) करणे म्हणजे दिव्यच असते. कारण रेल्वेत आरक्षण मिळणे, जागा मिळणे भाग्याची गोष्ट ठरते. रेल्वेत कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) मिळत नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. अनेकदा तिकिट मिळते पण ते वेटिंग तिकीट असते. तर हे वेटिंग तिकीट आहे तरी काय? ते किती प्रकारचे असते. त्याचा काय फायदा होतो, याची अनेकांना रेल्वे प्रवास करताना माहिती नसते. मग तिकीट असल्यावर आपल्याला आसन, जागा का मिळत नाही, असा संताप होतो. त्यामुळे रेल्वेचा प्रवास करताना वेटिंग तिकिटाची (Ticket Waiting) सर्व बाजू समजून घेतल्यास तुम्हाला मनस्ताप होणार नाही. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म, पक्के होत नाही, त्यांना रेल्वे वेटिंगवर ठेवते.

वेटिंग तिकीटावर प्रवास नाही कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशाला त्याचा प्रवास रद्द करावा लागला तर वेटिंग तिकीट असणाऱ्याला ती जागा मिळते. जर तुमचा वेटिंग लिस्ट क्रमांक 50 असेल तर याचा अर्थ त्यापूर्वीच्या 49 पैकी एकाने तिकिट रद्द करणे आवश्यक आहे. तर तुमचा क्रमांक पुढे सरकू शकतो. रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही वेटिंग तिकिटावर रेल्वेचा प्रवास करु शकत नाही. हे तिकीट रेल्वेचा पुढील प्रवास सुरु होताच आपोआप रद्द होते.

वेटिंग लिस्टची विवध श्रेणी

हे सुद्धा वाचा
  1. WL- जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट बुक करता, तेव्हा अनेकदा वेटिंग लिस्ट (WL) असा कोड लिहिलेला असतो. हा प्रतिक्षा यादीतील सर्वसामान्य कोड आहे.
  2. RAC- आरएसी कोडचा अर्थ रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सिलेशन (Reservation Against Cancelation) असा आहे. या आरक्षणात दोन प्रवाशांना एकाच बर्थवर यात्रेची परवानगी देण्यात येते. यामध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असते.
  3. RLWL- रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (Remote Location Waiting List) मध्ये तिकिट पक्के होण्याची खात्री अधिक असते. हा छोट्या स्टेशनचा बर्थ कोटा असतो. ही प्रतिक्षा यादी रेल्वे सुरु होण्याचे ठिकाण आणि गंतव्य स्थान या दरम्यान असते. तुमचे प्रवासाचे स्थानक ते गंतव्य स्थानक या दरम्यान एखादे रेल्वे तिकीट रद्द झाले तर हे तिकीट कन्फर्म होण्याची दाट शक्यता असते.
  4. PQWL-याचा अर्थ पुल्ड कोटा वेटिंग लिस्ट (Pooled Quota Waiting List) असा आहे. या तिकिटाचे कन्फर्म होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असते. दोन रेल्वे स्टेशनच्या दरम्यान एखाद्या स्थानकावर हे तिकीट देण्यात येते. पण हे तिकिट कन्फर्म होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
  5. TQWL- तात्काळ कोटा वेटिंग लिस्ट (Tatkal Quota Waiting List) असते. जर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळत नसेल तर रेल्वे हे तिकीट देते. हे तिकीट मिळाल्यानंतर ही तिकीट पक्के होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....