रेल्वे प्रवासात मोबाईलची बॅटरी लवकर का संपते? कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

प्रवासादरम्यान मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याचे तुम्ही अनेकदा अनुभवले असेल. यामागे नेमके कारण काय आहे हे कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का?

रेल्वे प्रवासात मोबाईलची बॅटरी लवकर का संपते? कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
मोबाईल बॅटरी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 5:20 PM

मुंबई, जास्त काळासाठी जेव्हा आपण घराबाहेर निघतो तेव्हा आपला मोबाईल (Mobile Discharge) सहसा पूर्ण चार्ज केला असल्याची खात्री नक्कीच करतो. बरेच जण ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वेने प्रवास (train Journey) करीत असताना तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे काय? रेल्वे प्रवासात जर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर यासाठी तुमच्या फोनला अजिबात दोष देऊ नका, कारण यात मोबाईलची काहीच चूक नाही. असे घडण्यामागे काही वेगळे कारण आहे.

प्रवास करताना मोबाईलची बॅटरी लवकर संपते आणि हे नेटवर्क व डेटा प्रोव्हायडरमुळे होते. जेव्हाही तुम्ही बराच काळ प्रवास करत असाल, मग तुम्ही ट्रेन, बस किंवा कारने प्रवास करत असाल, त्या काळात तुमच्या  फोनवर उपलब्ध असलेले नेटवर्क वारंवार बदलत राहते. प्रवासात, आपला फोन वारंवार नेटवर्क बदलतो आणि जवळचे नेटवर्क शोधतो आणि त्यातून नेटवर्क घेतो. पण प्रवासात सापडलेले हे नेटवर्क काही काळापुरतेच राहते, कारण प्रवास करताना आपण पुढे जातो आणि आपला फोन पुन्हा पुन्हा असे नेटवर्क बदलत राहतो. नवीन नेटवर्क शोधण्यासाठी मोबाईलवर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे जास्त बॅटरी लागते.

इंटरनेट आणि जीपीएस

प्रवासादरम्यान प्रत्येकजण फोन वापरतो. फोनमध्ये साठवलेला जुना देता पाहण्याचा काळ आता गेला आहे. फास्ट इंटरनेट उपलब्ध असल्याने प्रत्येकजण रिकाम्या वेळेत इंटरनेटचाच वापर करतो. त्यामुळे नवीन काही पाहण्यासाठी इंटरनेट असणंही आवश्यक आहे. पण, तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही प्रवासात इंटरनेट वापरत असाल तर फोनची बॅटरी लवकर संपते, कारण अशावेळी फोनला डेटा प्रोव्हायडर वारंवार बदलत राहावे लागते. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये जीपीएस सुरु असते त्यामुळे देखील फोनची बॅटरी लवकर संपते.

हे सुद्धा वाचा
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.