Indian Railway : पिवळ्या पाटीवरच कशासाठी स्टेशनच्या नावाची कलाकुसर! इतर रंगाची का आहे रेल्वेला ॲलर्जी

Indian Railway : तुम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्याच्या नावाची पाटी पाहिली असेलच. ती कायम पिवळ्या रंगाची आणि त्यावर काळ्या रंगाने स्टेशनचे नाव लिहिलेले दिसते. पण मग इतर रंगाचा वापर का बरं नसतील करत..

Indian Railway : पिवळ्या पाटीवरच कशासाठी स्टेशनच्या नावाची कलाकुसर! इतर रंगाची का आहे रेल्वेला ॲलर्जी
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 9:02 PM

नवी दिल्ली : देशात आजघडीला हजारो रेल्वे स्टेशन (Railway Station) आहेत. पण सर्व रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात  गिरवलेली असतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हाच कॉमन फॉर्म्युला दिसून येतो. या दोन रंगा व्यतिरिक्त इतर दुसरा रंग वापरत नाहीत. यामागचं लॉजिक काय असेल बरं, इतर रंगाची रेल्वे खात्याला ॲलर्जी तर नाही ना, का हे दोन रंग वापरण्यामागे खास वैज्ञानिक कारण आहे, असे प्रश्न तुमच्या पण मनात दंगा करत असतील. रेल्वे स्टेशनवरील इतर दिशा निर्देशही पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात (Railway Station Name Board)लिहण्यात येतात. यामागील कारणं तुम्हाला माहिती आहे का? ही काही अंधश्रद्धा नाही तर त्यामागे विज्ञान आहे.

जगातील मोठं नेटवर्क भारतीय रेल्वेतून तुम्ही कधी ना कधी प्रवास केलाच असेल. देशात जवळपास 7 हजारहून अधिक रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून 20 हजारांपेक्षा अधिक रेल्वे निघतात. रोज लाखो प्रवाशी रेल्वेतून प्रवास करतात. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी हा एक आहे. पण या सर्व रेल्वे स्टेशनवरील नेम बोर्ड कायम पिवळ्या रंगाचे असते. निळ्या, लाल अथवा हिरव्या रंगाचे नसते. यामागे एक कारण आहे.

हे आहे कारण देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे (Railway Station) नाव पिवळ्या रंगावर काळ्या अक्षरात लिहिण्यात येतात. कारण पिवळा रंग तुम्हाला दूरनही आकर्षित करतो. त्यामुळे लोको पायलटला रेल्वे स्टेशन येण्यापूर्वीच हा बोर्ड दिसतो. तसेच दिवस आणि रात्री दोन्ही वेळा चमकदार पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे चालकाला स्टेशनचे नाव दूरनच दिसते आणि त्याला थांबण्याचे सिग्नल मिळते.

हे सुद्धा वाचा

डोळ्यांना फायदा तसेच पिवळा रंग डोळ्यांना सुखावणारा असतो. तो डोळ्यांना त्रासदायक नसल्याचे मत आहे. त्यामुळे अंत्यत गर्दीच्या स्थानकावरही हा साईन बोर्ड तुम्हाला दिलासा देतो. तसेच हा बोर्ड लोको पायलटला जागरुक करतो. लोको पायलट प्लॅटफॉर्म थांबायचे नसेल तरी तो हॉर्न वाजवून लोकांना जागरुक करतो.

दूरुनच ओळखता येते पिवळ्या बोर्डावर काळ्या रंगातच रेल्वे स्थानकाचे नाव लिहिण्यात येते. तसेच इतर निर्देश आणि फलकही पिवळ्या रंगाची असतात. त्यावर काळ्या अक्षरात ही माहिती लिहिण्यात येते. त्यामुळे ही अक्षरे दूरुन दिसून येतात. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे चालकाला सूचना आणि स्थानकाचे नाव स्पष्टपणे लक्षात येते.

अनेकांना वाटत असेल की लाल रंग तर अत्यंत भडक आणि लक्षणीय असतो. तो का नाही वापरत? रेल्वे स्टेशनची नावे लाल रंगाच्या पाटीवर का लिहिण्यात येत नाही. लाल रंग हा धोक्याची निशाणी म्हणून वापरल्या जातो. त्यामुळे या रंगाचा वापर करण्यात येत नाही.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.