हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ?
भारतीय 100, 200, 500 च्या नोटांना निरखून पाहिले का, त्यावर तीन तिरप्या रेषा असतात. काय आहे या तिरप्या रेषांचा अर्थ, कशासाठी छापल्या जातात या रेषा, त्यामागील कारणं जाणून घेऊयात.
नवी दिल्ली : हातांवरील रेषा लोकांचे भाकित सांगतात. भविष्याची रंगीत दुनिया आणि त्यातील संकटांची माहिती देतात. तर काही रेषा या किंमत सांगतात. आश्चर्य वाटलं ना, तर नोटांवर अंकित या रेषा त्या नोटाचं मूल्य, किंमत सांगते. या नोटांवर जेवढ्या रेषा बोटाला स्पर्श करतात, त्या संबंधित नोटेची किंमत सांगतात. डोळे असून आंधळा ही म्हण आपल्याला माहित आहे, पण नेत्रहिन लोकांना डोळस करणारी या रेषेचं मूल्य तेच जाणतात.
भारतीय चलनात काही तरी वेगळी वैशिष्ट्ये आहेत, जी तुमचं लक्ष वेधून घेतात. अशोक स्तभ, महात्मा गांधींचे छायाचित्र, छापलेले क्रमीत क्रमांक, रंगसंगती याचं आपल्याला आकर्षण वाटतं. या नोटांवर तिरप्या रेषाही आपल्याला दिसतात. का असतात बरं या तिरप्या रेषा त्याचा उपयोग काय असा प्रश्न आपल्याला पडतो. तर जाणून घेऊयात या तिरप्या, आडव्या रेषांबाबत.
ब्लीड मार्क्सची आवश्यकता
नोटांवरील या तिरप्या अथवा आडव्या रेषांना ( Bleed Marks) म्हणतात. यांना आंधळ्या लोकांसाठी तयार करण्यात येते. आंधळी व्यक्ती या रेषांना स्पर्श करुन ही नोट किती रुपयांची आहे, याची खातरजमा करु शकते. या रेषा 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर अंकित असतात. प्रत्येक नोटेवर या रेषांची संख्या वेगळी असते. या रेषांप्रमाणे त्यांचं मूल्य अंधाळ्या व्यक्तीला कळतं.
कोणत्या नोटेवर किती लाईन्स
प्रत्येक नोटेवर वेगवेगळ्या लाईन्स, रेषा असतात. त्याआधारे 100 आणि 200 रुपयांच्या नोटेवर दोन्ही बाजुंनी चार-चार लाईन्स आणि दोन -दोन शुन्य, झिरो असतात. तर 500 रुपयांच्या नोटेवर 5 तर 2000 रुपयांच्या नोटेवर दोन्ही बाजूंनी 7-7 रेषा असतात. या रेषांना स्पर्श करुन नेत्रहीन व्यक्ती नोटांची किंमत सांगते.
नोटांवरील छायाचित्रांचा इतिहास
प्रत्येक नोटेवर एक खास चित्र गोंदण्यात येते. जसे की 200 रुपयांच्या नोटेवर मागील बाजूस, सांची स्तूप छापण्यात आले आहे. हा स्तूप मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आहे. जो भारतीय वास्तू संरचनेतील सर्वात जुना वारसा आहे. सम्राट अशोक याने याची निर्मिती केली होती. 500 रुपयांच्या नोटेवर लाल किल्ला तर 2000 रुपयांच्या नोटेवर मंगळयानाचे छायाचित्र छापण्यात आले आहे. 100 रुपयांच्या नोटेवर राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. त्याला रानी की वाव अशा नावाने ओळखले जाते. गुजरात जिल्ह्यातील पाटन जिल्हयात ती आहे. सोळंकी वंशाची राणी उदयमति हिने पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ती तयार केली आहे. 2014 साली युनोस्कोने या विहिरीला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषीत केले आहे.
संबंधित बातम्या
चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात तेजी, काय आहेत आजचे दर?
जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डानासाठी सज्ज; काय आहे कंपनीची भविष्यातील रणनिती?