AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : आयटीआर फाईल करण्याची वाढेल का अंतिम मुदत? सोशल मीडियावर हीच मागणी

Income Tax : इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आता एकदम जवळ येऊन ठेपली आहे. दोनच दिवस हाती उरले आहेत. पण ही तारीख वाढविण्याची विनंती करण्यात येत आहे. सोशल मीडियावर युझर्सने प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

Income Tax : आयटीआर फाईल करण्याची वाढेल का अंतिम मुदत? सोशल मीडियावर हीच मागणी
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 5:21 PM

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल (Income Tax Return) करण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. केवळ तीन दिवस आयटीआर भरण्यासाठी उरले आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 कोटींहून अधिक करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल केला आहे. पण अनेक लोकांनी अजूनही आयटीआर फाईल केलेला नाही. वेळेच्या आत आयटीआर दाखल केला नाही तर दंड बसू शकतो. 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. पण सोशल मीडियावर आयटीआर फाईल करण्याची डेडलाईन (ITR Filing Deadline) वाढविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पण खरंच केंद्र सरकार आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवणार आहे की नाही?

केंद्र सरकारचे धोरण काय

केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Finance Ministry) आयटीआर अंतिम मुदत वाढविण्याविषयी भूमिका मांडली आहे. त्यामुळे या तीन दिवसांतच आयटीआर भरण्याची घाई करा. उत्तरेसह पश्चिम भारताला पावसाने झोडपून काढले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरातमध्ये पूराने थैमान घातले आहे. टॅक्स असोसिएशनने ATBA आणि सेल्स टॅक्स बार असोसिएशनने अर्थमंत्रालयाला याविषयीचे पत्र लिहिले आहे. त्यानुसार आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे. तर महसूल सचिवांनी अंतिम मुदत वाढविण्याच्या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे.

हे सुद्धा वाचा

काय केली मागणी

देशातील कर व्यावसायिकांची सर्वात जुनी आणि मोठ संस्था सेल्स टॅक्स बार असोसिएशनने याविषयी मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या संस्थेने पत्र लिहिले आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीत पूर आलेला आहे. त्यामुळे आयकर खात्यासह इतर अनेक कार्यालयांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. अनेक करदाते या शेवटच्या टप्प्यात कर भरतात. अनेक ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. इंटरनेट कोलमडले आहे. त्याचा फटका करदात्यांना बसला आहे. त्यामुळे आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता उरले तीन दिवस

करदात्यांना या वादात न पडता, सर्वात अगोदर येत्या तीन दिवसांत आयटीआर भरण्यावर भर द्यावा. त्यासाठीच्या कागदपत्रांची जलद पूर्तता करावी. त्यासाठी 31 जुलैची वाट पाहण्याची गरज नाही. 1 ऑगस्टपासून आईटीआर फाईल केल्यास करदात्याला 1,000 रुपये ते 5,000 रुपये दंड भरावा लागेल. कर न भरल्यास आयकर विभाग नोटीस पाठवेल.

ऑनलाईन कसे करावे ITR फाईल

आयकर खात्याने करदात्यांना ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, ई-फाईलिंगसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी https://www.incometax.gov.in/iec / foportal वर लॉग इन करावे लागेल. तुम्हाला ऑनलाइन आईटीआर फाईल करु शकता.

वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.