येस बँकेसह डीसीबीकडून बचत खात्यातील व्याजदरात कपात; गुंतवणूक करण्यापूर्वी तपासा नवे दर
येस बँक बँकेने बचत ठेवीच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.25 टक्के कपात केली आहे. नवीन व्याजदर ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी बचत खात्यांना लागू आहेत. तर डीसीबी बँकेने बचत ठेवींच्या व्याजदरातही बदल केला आहे.
नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील येस बँक (Yes Bank) आणि डीसीबी बँकेने (DCB Bank) बचत खात्यांच्या व्याजदरात बदल केला आहे. येस बँकेने बचत खात्याच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट (Basis Point) म्हणजेच 0.25 टक्के कपात केली आहे.नवीन व्याजदर ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी बचत खात्यांना लागू आहेत. नवे दर 8 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. ग्राहकांना व्याज दराचा लाभ मिळविण्यासाठी बचत खात्यात मासिक न्यूनतम शिल्लक (AMB) ठेवावी लागणार आहे. हे व्याज दररोज मोजण्यात येईल आणि ग्राहकांच्या बचत खात्यात तिमाही जमा केले जाईल. डीसीबी बँकेने बचत खात्यातील रक्कमेवरील व्याजदरात बदल केला आहे. नवे दर 7 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. निवासी, अनिवासी बचत खात्यांना नवे दर लागू होणार आहेत. ही बँक एलिट सेव्हिंग्ज अकाउंट, फॅमिली सेव्हिंग्ज अकाउंट, शुभ लाभ बचत खाते, विशेषाधिकार बचत खाते, कॅशबॅक बचत खाते, क्लासिक सेव्हिंग्ज अकाउंट आणि बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट (BSBDA) खाते देते.
येस बँकेच्या बचत खातेधारकांना झटका
‘गुड्सरिटर्न’च्या अहवालानुसार येस बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. 8 फेब्रुवारी 2022 पासून बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या दैनंदिन बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 4 टक्के वार्षिक व्याजदर देणार आहे. यापूर्वी बँक बचत खात्यातील एक लाख रुपयांपेक्षा अधिक आणि 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बॅलन्सवर 4.50 टक्के व्याज देत होती. मात्र, बँकेने या शिल्लकी श्रेणीत(Balance Slab) 4.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. बँकेने यापूर्वी 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 5 टक्के व्याजदर देऊ केला होता, मात्र आता हा दर 4.75 टक्के असेल. बँकेकडे पूर्वी 1 कोटी ते 100 कोटी रुपयांचा डेली बॅलन्स स्लॅब होता, त्यावर 5.25 टक्के व्याजदर होता, पण आता बँकेने या शिल्लकी श्रेणीची दोन प्रकारात विभागणी केली आहे. येस बँक आता 1 कोटी ते 25 कोटी रुपयांच्या दैनंदिन बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 5 टक्के आणि 25 कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंत दैनंदिन बचत शिल्लक रकमेवर 5.25 टक्के व्याज देत आहे.
डीसीबी बँक बचत खाते व्याज दर
बँक 7 फेब्रुवारी 2022 पासून खात्यात एक लाख रुपयांपर्यंतच्या बॅलन्सवर 2.50 टक्के व्याज देत आहे. बँक सध्या 1 लाख ते 2 लाख रुपयांच्या बॅलन्सवर 4.50 टक्के व्याज देत आहे. डीसीबी बँक सध्या 2 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमी बॅलन्सवर 5 टक्के व्याज देत आहे. डीसीबी बँक सध्या 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या खात्यातील शिल्लक रकमेवर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. 25 लाख आणि 50 लाख रुपये शिल्लक रकमेवर 6.50 टक्के व्याजदर असेल. 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर बँक सर्वाधिक 6.75 टक्के व्याज देत आहे.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?