WhatsApp : जरा जपून जपून पुढे धोका आहे! या क्रमांकावरुन आलेला कॉल उचलूच नका, व्हॉट्सअपचा अलर्ट
WhatsApp : तंत्रज्ञाना जशी आघाडी घेत आहे, तसा फसवणुकीचे प्रकार पण हायटेक होत आहे. तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर काही दिवसांपासून अनोळखी क्रमांकावरुन कॉल, एसएमएस येत असेल तर सावध रहा..पुढे धोका आहे..
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप वापरकर्त्यांना अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन (WhatsApp unknown numbers) व्हॉट्सअपवर कॉल आणि एसएमएस येत आहे. हा अनुभव तुम्हाला पण आला असेल. या मॅसेजमध्ये इंग्रजीतून आकर्षित करणारा मजकूर असतो. यामध्ये युट्यूब लाईक करणे, स्क्रीनशॉट काढून पैसा कमाविण्याची युक्ती सांगण्यात येते. सहज बक्कळ पैसा कमाविण्याच्या योजनांचे आमिष दाखवून सावजाला जाळ्यात ओढण्यात येते. ग्राहकांना खात्याचा तपशील देण्यास सांगण्यात येते नाहीतर त्यांचा फोन पे, गुगल पे क्रमांक मागण्यात येतो. त्यानंतर सावध जाळ्यात आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या शुल्क भरण्यास सांगण्यात येते. कधी कधी क्लोन तयार करुन बँक खाते साफ करण्यात येते. व्हॉट्सअपने युझर्सला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
व्हॉट्सअप अलर्ट व्हॉट्सअप अलर्टने CNBC TV 18 याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, अशा घोटाळेबाजांना हुडकून काढण्यासाठी कंपनीने नवीन तंत्रज्ञान विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्पॅम मॅसेज आणि क्रमांक ओळखण्याचे काम सुरु आहे. यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे. वापरकर्त्याच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्हॉट्सअपने एका अधिकाऱ्याची नियुक्ती पण केली आहे. या अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधल्यास अशा बदमाशांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
खास मोहिम व्हॉट्सअपने इन-बिल्ट प्रोडक्ट सुविधा आणि दोन सत्यापन प्रक्रिया, ब्लॉक आणि रिपोर्ट, गोपनियता नियंत्रण या बाबत वापरकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी व्हॉट्सअप करत आहे. त्यासाठी कंपनीने ‘stay safe with WhatsApp’ नावाचे एक अभियान सुरु केले आहे. ऑनलाईन पद्धतीने वापरकर्त्यांना या सायबर फ्रॉडपासून वाचविण्याची माहिती देण्यात येणार आहे.
सातत्याने या क्रमांकाचा वापर या अनोळखी क्रमांकावरुन सातत्याने कॉल, एसएमएस येत आहेत. वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे व्हॉट्सअपने हे आंतरराष्ट्रीय क्रमांक जाहीर केले आहेत. वापरकर्त्यांनी त्यापासून सावध रहावे. यामध्ये +251 (इथिओपिया), +60 (मलेशिया), +62 (इंडोनेशिया), +254 (केनिया) आणि +84 (व्हिएतनाम) या क्रमांकापासून सुरुवात होणाऱ्या कॉल आणि एसएमएसचा भडिमार आहे.
नवीन ॲप असे करा डाऊनलोड आता व्हॉट्सअपने एकाचवेळी चार डिव्हाईसवर व्हॉट्सअप सुरु करण्याचे फिचर दिले आहेत. एकाच मोबाईल क्रमांकावरुन युझर त्याचे व्हॉट्सअप चार डिव्हाईसमध्ये (Linked to 4 Devices) वापरु शकतो. मेटाने ट्विटरच्या माध्यमातून नवीन ॲपची माहिती दिली. त्यासाठी एक लिंक शेअर केली होती. व्हॉट्सअपनुसार, डिव्हाईस लिंक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. तसेच सहजच कोणी पण चार ही डिव्हाईसवर एकच ॲप वापरु शकेल. तसेच चॅटिंग करता येईल. नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी युझर्सला https://whatsapp.com/download या लिंकला भेट द्यावी लागेल.
असे लिंक करा व्हॉट्सअप जर तुम्ही व्हॉट्सअपचे वापरकर्ते असाल. तर चार डिव्हाईसवर एकाच क्रमांकावरुन चॅटिंग करु शकता. त्यासाठी तुम्हाला मल्टि-डिव्हाईस फीचरचा वापर करता येईल. व्हॉट्सअपच्या नवीनत्तम ॲपची आवृत्ती तुम्हाला अद्ययावत करावी लागेल. ॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यावर सर्वात वरती असलेल्या तीन बिंदूवर टॅप करुन तुम्हाला लिंक्ड डिव्हाईस वर टॅप करुन कनेक्ट करता येईल. त्यासाठी QR कोड स्कॅन करावे लागेल.