Passport : पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी ही चढू नका.. तरीही मिळवा नाहरकत प्रमाणपत्र

Passport : पासपोर्ट काढणे हे एक दिव्यच असते. पण एक नियम बदल्यामुळे तुमचे एक मोठे काम हलके होणार आहे..

Passport : पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी ही चढू नका.. तरीही मिळवा नाहरकत प्रमाणपत्र
नियम बदलल्याने मोठा दिलासाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:00 PM

नवी दिल्ली : पासपोर्ट (Passport) काढायचा म्हणजे अनेकांच्या अंगावर काटा येतो. पासपोर्टसाठी अनेक किचकट पायऱ्या पार कराव्या लागतात. पण केंद्र सरकारने (Central Government) पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अनेक बदलही (Changes) सुरु आहेत.

पासपोर्ट काढण्यासाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (Police clearance Certificate) पोलीस नाहरकत प्रमाणपत्राचे फार महत्व आहे. पोलीस तुमच्या घराची आणि पत्त्याची तपासणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र देतात. पण ही प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ आहे. पासपोर्टसाठी खटाटोप करणाऱ्यालाच त्याचा त्रास कळतो.

एका प्रयत्नात पोलीस ठाण्यातील या नाहरकत प्रमाणपत्राचे काम काही होत नाही. त्यासाठी अनेकदा पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागतात. पोलीस घरी येऊन तपासणी करत नाही, तोपर्यंत हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे अनेकदा त्वरीत पासपोर्ट काढणाऱ्यांची अडचण होते.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारने नेमकी ही अडचण ओळखली आणि त्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे तुम्हाला पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची आवश्यकता राहिली नाही. आता अर्जदाराला पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रात ही सुविधा मिळेल.

पोस्ट ऑफिसमध्येच अर्जदाराला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (Police clearance Certificate) पोलीस नाहरकत प्रमाणपत्र मिळेल. त्यासाठी पोलीस ठाण्यात तंगडतोड करण्याची गरज नाही. 28 सप्टेंबर म्हणजे आजपासून हा बदल करण्यात आला आहे.

पोलीस नाहरकत प्रमाणपत्र प्रत्येक वेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून मिळते. हे प्रमाणपत्र स्थानिक पत्ता आणि अर्जदाराच्या निवासाच्या ठिकाणावरुन तयार होते. पासपोर्ट तयार करण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. पोलीस त्यासाठी कागदपत्रे आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासतात.

परराष्ट्र मंत्रालयाने या सेवेची माहिती दिली. त्यानुसार, पोस्ट कार्यालयात ही सुविधा सुरु झाल्याने नागरिकांची मोठ्या अडचणीतून सूटका झाली आहे. अर्जदाराला आता ऑनलाईन पोस्ट कार्यालयाच्या पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज करु शकता.

अर्जदार अगोदरच अपॉईंटमेंट घेऊ शकतो. त्यामुळे त्याचा वेळ ही वाचेल. त्याचा पासपोर्ट ही लवकर मिळेल. त्यामुळे परदेशी नोकरीसाठी जाणाऱ्या, शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणाला मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सेवेमुळे छोट्या शहरातील नागरिकांनाही सहज पासपोर्ट काढता येणार आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.