Post Info: एका क्लिकवर सर्वकाही ! विमा हप्त्याच्या आकडेमोडीपासून ते व्याज दरांपर्यंत या अॅपवर ए टू झेड माहिती
पोस्ट खात्याच्या पोस्ट इन्फो अॅपवर ग्राहकाला विमा हप्त्याच्या आकडेमोडीपासून ते व्याज दरांपर्यंत या अॅपवर ए टू झेड माहिती मिळेल. तसेच इंटरनेट सुरु नसतानाही पोस्ट कार्यालय आणि पिन कोडची माहिती घेता येईल.
टपाल खात्याने (Post Office) पोस्ट इन्फो (Post Info) नावाचे मोबाईल अॅप ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. पोस्ट खात्याच्या पोस्ट इन्फो अॅपवर ग्राहकाला विमा हप्त्याच्या आकडेमोडीपासून ते व्याज दरांपर्यंत या अॅपवर ए टू झेड माहिती मिळेल. पोस्ट खात्यााच्या कोणत्याही योजनेविषयी अथवा विमा योजना(Insurance Policy) , त्याच्या प्रीमियमविषयी माहिती घ्यायची असेल तर एका चुटकीत ही माहिती मिळविता येईल. तुम्हाला फक्त एक क्लिक करायची आहे नी माहिती तुमच्या पुढ्यात असेल. यासोबतच योजनेचा हप्ता आणि त्यावरील व्याजाची संपूर्ण माहिती समोर येईल. कोणत्या योजनेत किती व्याज मिळत आहे. योजनेचा कालावधी आणि परिपक्वतेविषयी माहिती मिळेल.
याविषयीची सर्व माहिती ग्राहक पोस्ट इन्फो या अॅपवरुन सहज प्राप्त करु शकेल .त्यामुळे ग्राहकाला योजनांविषयीची अपडेट, अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होईल. त्यासाठी त्याला टपाल कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. पोस्ट इन्फो अॅप एंड्राईड मोबाईलवर चालते. या अॅपमुळे पोस्ट खात्याच्या अनेक योजनांची एकत्रित माहिती ग्राहकाला प्राप्त होते. यामध्ये सर्व्हिस रिक्वेस्ट, आर्टिकल ट्रॅकिंग, इंटरनेट सुरु नसतानाही पोस्ट कार्यालय आणि पिन कोडची माहिती घेता येते. पोस्टेज कॅलक्युलेटर, विमा आणि व्याजाची आकडेमोड करणारे कॅलक्युलेटर आहे. सोबतच एजेंट लॉगिन, कस्टमर लॉगिन, पॉलिसी खरेदी आणि हप्त्याची आकडेमोड याविषयीची संपूर्ण माहिती मिळते.
ग्राहकाला पोस्ट खात्याच्या एखाद्या योजनेविषयी माहिती हवी असेल तर त्याला सर्विस रिक्वेस्टवर जाऊन त्यासाठी अप्लाय करता येते. त्यासाठी विशेष करुन पोस्ट कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. एखादे सामान, पुस्तक, भेट वस्तू कुरियर अथवा स्पीड पोस्टाने पाठवायची असेल अथवा मागवली असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या अॅपच्या माध्यमातून मिळते. जवळपास कोणे टपाल कार्यालय आहे. त्याचा पिन कोड सर्च करता येतो.
हप्त्यांची आकडेमोड जर तुम्ही एखादी पॉलिसी घेतली असेल तर त्याविषयीची माहिती या अॅपच्या माध्यमातून घेता येते. एका 25 वर्षाच्या व्यक्तीने 15 वर्षांकरीता पोस्ट खात्याची विमा योजना घेतली असेल तर त्याला 1320 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. करासहित ही रक्कम 1369 रुपये होईल. पॉलिसी खरेदी करणारा ज्यावेळेस 40 वर्षांचा होईल. तेव्हा त्या व्यक्तीला बोनस स्वरुपात 1,44,000 रुपये मिळतील. तर मॅच्युरिटीनंतर खात्यात 3,44,000 रुपये जमा होतील. यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट इन्फो या अॅपद्वारे प्राप्त होईल. विशेष म्हणजे पॉलिसी, प्रीमियममध्ये बदल झाला, नवीन माहिती अद्ययावत झाली तर ती आपोआप तुमच्या अॅपमध्ये अद्ययावत होईल.
संबंधित बातम्या :
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला