Aadhaar-Pan Card : केवळ एक SMS करेल मोठं काम! असं जोडा आधारसोबत पॅन

Aadhaar-Pan Card : केवळ एका एसएमएसवर तुम्ही आधार कार्ड आणि पॅनकार्डची जोडणी करु शकता. त्यासाठी कोणत्याही साईटवर जाण्याची गरज नाही. अथवा दुसरा पर्याय शोधण्याची गरज नाही.

Aadhaar-Pan Card : केवळ एक SMS करेल मोठं काम! असं जोडा आधारसोबत पॅन
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 5:56 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यापूर्वी अनेकदा नागरिकांना आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅनकार्ड (PAN card) हे दोन्ही महत्वपूर्ण दस्तावेज जोडण्याचे आवाहन केले होते. तसेच वेळोवेळी संधी पण दिली होती. पण अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्यावर या दोन्ही कार्डची जोडणी अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला 500 रुपये दंड, पुढे 1000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर ही मुदत मार्च महिन्यात पुन्हा वाढविण्यात आली. आता जून महिन्यापर्यत या दोन्ही कार्डची जोडणी करता येणार आहे. जर तुम्ही आता दोन्ही कार्डचे लिकिंग (Pan Aadhaar Link) केले नाही तर पॅनकार्ड बाद होईल. त्यानंतर तुमची सर्वच कामे अडकतील .

ही आहे शेवटची मुदत आयकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम तारीख केली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाही. कारण यासर्व व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो.

एक एसएमएस फायद्याचा

हे सुद्धा वाचा
  1. पॅनकार्ड-आधार कार्ड लिंक करणे सहज सोपे
  2. मोबाईलवरुन एसएमएस पाठवून लिकिंग करता येईल
  3. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा करावा लागेल वापर
  4. मोबाईलवरुन 567678 वा 56161 वर एसएमएस पाठवा
  5. UIDPAN<स्पेस><12 अंकी आधार कार्ड><स्पेस><10 digit PAN>
  6. असा एसएमएस 567678 वा 56161 क्रमांकावर पाठवा
  7. तुमचे नाव आणि जन्मतारीख आधार आणि पॅनकार्डवर एकच हवी

तर मोठा दंड 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

नियम काय सांगतो आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

तर होईल नुकसान डेडलाईनपर्यंत आधार-पॅनकार्ड लिकिंग नाही केले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्या नागरिकाला, करदात्याला आयकर रिटर्न फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तर त्याचा टॅक्स रिफंडही अडकून पडेल. तर त्याच्या दुसऱ्या आर्थिक व्यवहारांवर पण परिणाम होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाते उघडण्यास अडचण होईल. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉकमधील गुंतवणूक करणे अडचणीचे ठरेल.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.