फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता ‘हे’ खाते, चांगल्या परताव्यासह सुरक्षेचा लाभही मिळेल

भारतीय पोस्ट लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी नऊ वेगवेगळ्या बचत योजना ऑफर करते. या नऊ योजनांपैकी एक पोस्ट ऑफिस बचत खाते योजना आहे.

फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता 'हे' खाते, चांगल्या परताव्यासह सुरक्षेचा लाभही मिळेल
फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता 'हे' खाते
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 4:29 PM

नवी दिल्ली : आपल्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. बचत केल्याने आपल्याला भविष्यात आकस्मिक खर्च हाताळण्यात खूप मदत होते. तुमच्याकडे बचतीच्या रूपात छोटी रक्कम असेल आणि तुम्हाला ती कोणत्याही योजनेत गुंतवायची असेल, तर पोस्ट ऑफिसचे पोस्ट ऑफिस बचत खाते (SB) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. भारतीय पोस्ट लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी नऊ वेगवेगळ्या बचत योजना ऑफर करते. या नऊ योजनांपैकी एक पोस्ट ऑफिस बचत खाते योजना आहे. या योजनेंतर्गत चांगल्या परताव्याच्या लाभासोबतच गुंतवणूकदारांना सरकारी सुरक्षेचाही लाभ मिळतो.

ठेव रक्कम किती आहे?

पोस्ट ऑफिस बचत खाते (SB) योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती किमान 500 रुपयांच्या रकमेसह त्याचे खाते उघडू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेत पैसे जमा करण्याची कमाल मर्यादा नाही. याशिवाय, तुम्ही तुमच्या खात्यातून किमान 50 रुपये देखील काढू शकता.

कोण उघडू शकतो खाते?

पोस्ट ऑफिस बचत खाते (SB) योजनेअंतर्गत, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती आपले बचत खाते उघडू शकते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये व्यक्ती एकच खाते उघडू शकते. या योजनेंतर्गत पालकाच्या वतीने अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते. याशिवाय या योजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

किती व्याज मिळते?

पोस्ट ऑफिस बचत खाते (SB) योजनेमध्ये खातेदाराला एकल किंवा संयुक्त कोणत्याही प्रकारचे खाते उघडल्यावर 4 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, सर्व बचत बँक खात्यांवरील 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज करपात्र उत्पन्नातून मुक्त आहे. महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आणि महिन्याच्या अखेरीस 500 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास, तुम्हाला कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (You can open this account for only Rs.500, with good returns and security benefits)

इतर बातम्या

भारतीयांची फसवणूक करणारे टेक सपोर्ट स्कॅम नक्की काय आहे? जाणून घ्या याबाबत सर्वकाही

आता ईपीएफमध्ये नॉमिनी बदलणे झाले सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....