RBI News on 2000 Note : भावा, केवळ रांगेत उभे राहू नको, ही कागदपत्रे ठेव सोबत आणि हा अर्ज दे भरुन

RBI News on 2000 Note : 23 मेपासून बँकांसमोर गुलाबी नोटा बदलण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. तशा या नोटा फारकाही चलनात नसल्या तरी अनेकांकडे या नोटा आहेत. तेव्हा नोटा बदलण्याची ही प्रक्रिया माहिती असू द्या.

RBI News on 2000 Note : भावा, केवळ रांगेत उभे राहू नको, ही कागदपत्रे ठेव सोबत आणि हा अर्ज दे भरुन
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 10:36 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी अचानक दोन हजार रुपयांची नोट (2000 Rupee Notes) बंद करण्याची घोषणा केली. या गुलाबी नोटा कशा बदलायच्या याविषयी लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. गेल्या वर्षभरापासून तशाही या नोटा फारशा चलनात नाही. ज्यांच्याकडे या नोटा नाहीत, त्यांना चिंता नाही. या नोटा बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बँका आणि व्यावसायिक मध्यस्थी केंद्रात तुम्हाला या नोटा बदलता येतील. बँकेचे खाते नसले तरी बँकेत जाऊन या नोटा बदलता येतील. नोटा बदलायच्या नसतील तर खात्यात जमा करता येतील. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तोपर्यंत या नोटा व्यवहारात वैध (Legal Tender) आहेत.

नोटा बदलण्यासाठी भरा हा अर्ज 23 मे 2023 रोजी बँकांमध्ये जाऊन नोटा बदलता येतील. एका दिवशी 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलता येतील. त्यासाठी केवळ रांगेत उभं राहिलं की झालं, असं अजिबात नाही. बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरुन द्यावा लागेल. हा अर्ज बँकेत उपलब्ध असेल. ग्राहकाला बँकेतच तो भरुन देता येईल. अथवा घरी जाऊन भरुन पुन्हा बँकेत येता येईल.

हे सुद्धा वाचा

ही कागदपत्रे आवश्यक बँकेत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचे मुळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगाकार्ड, पॅनकार्ड अथवा इतर संबंधित ओळखपत्र यापैकी एक सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याची झेरॉक्सही सोबत ठेवावी लागेल.

अर्जात भरा हा तपशील

  1. या अर्जात सर्वात अगोदर बँकेच्या शाखेचे नाव द्यावे लागेल
  2. तुमच्या बँकेचे खाते असेल तर त्या खात्याचा क्रमांक नोंदवावा लागेल
  3. त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव लिहावे लागेल
  4. या अर्जासोबत ओळखपत्राची एक झेरॉक्स जोडावी लागेल
  5. अर्जावर संबंधित आयडी कार्डचा क्रमांक नोंदवावा लागेल
  6. 2,000 रुपयांच्या किती नोटा बदलायच्या ती माहिती द्यावी लागेल
  7. या नोटांचे एकूण मूल्य, म्हणजे किती हजारांच्या नोटा बदलवणार आहात, त्याची माहिती द्यावी लागेल
  8. सर्वात शेवटी नोटा बदलवणाऱ्याला त्याची स्वाक्षरी करावी लागेल
  9. त्याखाली तारीख आणि ठिकाण लिहावे लागेल

गैरसमज दूर करा

  1. सोप्या शब्दात नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत
  2. या नोटा लगेचच बंद करण्यात आल्या नाहीत, त्या अजून चार महिने चलनात आहेत
  3. या नोटांना हळूहळू व्यवहारातून संपूर्णपणे बाहेर करण्यात येईल
  4. नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील
  5. एका वेळी ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचं या नोटा जमा करता येतील
  6. या 23 मे पासून नागरिकांना केंद्र सरकारच्या बँकेत या नोटा जमा करता येतील

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.