Indian Railway : सुटली ट्रेन, घेऊ नका टेन्शन, तिकिटाचा पैसा असा मिळेल रिफंड

Indian Railway : रेल्वेचे तिकिटाचा पैसा रिफंड मिळतो, त्यासाठी ही सोपी प्रक्रिया करावी लागते.

Indian Railway : सुटली ट्रेन, घेऊ नका टेन्शन, तिकिटाचा पैसा असा मिळेल रिफंड
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 5:55 PM

नवी दिल्ली : घाई गडबडीत अनेकदा रेल्वे सुटते, त्यात काही नवीन नाही. घरातून लवकर निघाल्यानंतरही वाहनांच्या गर्दीत आपण फसतो. अथवा अचानक काही तर सूटतं, फुटतं आणि मग आपल्याला उशीर होतो. रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म शोधण्यापासून तो गाठण्यापर्यंत कितीही धावपळ केली तरी रेल्वे आपली डौलात निघून जाते. आपण प्लॅटफॉर्मवर हताश पण हे बघत राहतो. त्यामुळेच गुगलवर Can I get refund if I missed train म्हणजे रेल्वे सुटली तर मी माझ्या तिकिटासाठी खर्च केलेली रक्कम कशी परत मिळवू, हे सर्वाधिक सर्च होतं. तुमची रेल्वे सुटली तरी तुम्हाला तिकिटाचे पैसे, रक्कम (Train Ticket Refund) परत मिळते.

काय सांगतो नियम रेल्वे तिकिट रिफंड नियमानुसार, प्रवाशाची रेल्वे सुटली तर त्याला तिकिटाचे पैसे परत मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी विहित प्रक्रिया केल्यानंतर तिकिटाची रक्कम परत मिळते. पण ही रक्कम परत मिळविण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागते. काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागते. त्यासाठी काही कागदी घोडे नाचवावे लागतात.

TDR भरुन मिळवा रिफंड तिकिटाची रक्कम परत मिळविण्यासाठी तुम्हाला टीडीआर (Ticket Deposit Receipt-TDR) दाखल करावा लागेल. रेल्वे सुटल्यानंतर, रेल्वे निघून गेल्यानंतर एक तासाच्या आत टीडीआर फाईल करावा लागेल. ऑनलाईन अथवा ऑफलाईन टीडीआर फाईल करता येतो. रिफंडसाठी रेल्वेच टीडीआर जारी करते. रिफंडची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी लागतो.

हे सुद्धा वाचा

I-ticket वर ऑनलाईनवर नाही भरता येणार टीडीआर I-ticket ऑनलाईन पद्धतीने बुक करता येते. हे एक कगदाचं तिकिट असतं. रेल्वे सुटल्यानंतर आय-तिकिटाचे पैसे रिफंड मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नहाी. त्यासाठी रेल्वे स्टेशन मास्टरकडे आय-तिकिट जमा करावे लागते. त्यानंतर टीडीआर घेऊन, ते भरुन जीजीएम (आयटी), इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, इंटरनेट तिकिट केंद्र, IRCA बिल्डिंग, स्टेट एंट्री रोड, नवी दिल्ली 110055, या पत्त्यावर पाठवावे लागते.

ऑनलाईन असा जमा करा टीडीआर

  1. तुमच्या IRCTC अकाऊंटमध्ये लॉग-इन करा
  2. बुक तिकिट हिस्ट्रीवर क्लिक करा
  3. ज्या पीएनआरसाठी टीडीआर भरला आहे, तो निवडा
  4. पुन्हा फाईल टीडीआरवर क्लिक करा
  5. टीडीआर रिफंडसाठी तिकिटाचा तपशीलातील प्रवाशाचे नाव निवडा
  6. टीडीआर का फाईल करत आहात, त्याचे कारण निवडा
  7. अन्य कारणासाठी “Other” वर क्लिक करा
  8. आता सबमिट बटणवर क्लिक करा
  9. तुम्ही “Other” ऑप्‍शन निवडले असेल तर टेक्स्ट बॉक्स उघडेल
  10. त्यात रिफंडची कारणे लिहा आणि सबमिट करा
  11. टीडीआर फाईल करण्यासाठी कन्फर्मेशन दिसेल
  12. संपूर्ण तपशील दिल्यानंतर ओकेवर क्लिक करा

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.