तुमचा Credit score कमी आहे? चिंता करू नका; ‘या’ काही सोप्या उपयांनी वाढवा आपला क्रेडिट स्कोर
कर्ज (Loan) घेऊन आपले स्वप्न पूर्ण करणे हे सध्या सर्वसामान्य झाले आहे. अनेक जण कर्ज घेऊन आपले विविध सप्न साकार करतात. त्यानंतर नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर घेतलेल्या कर्जाचे हप्ते (EMI) फेडतात. मात्र तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तरच तुम्हाला कर्ज मिळते.
कर्ज (Loan) घेऊन आपले स्वप्न पूर्ण करणे हे सध्या सर्वसामान्य झाले आहे. अनेक जण कर्ज घेऊन आपले विविध सप्न साकार करतात. त्यानंतर नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर घेतलेल्या कर्जाचे हप्ते (EMI) फेडतात. सामान्यपणे नवी घर घेण्यासाठी, मुलांचे शिक्षण करण्यासाठी, नवीन वाहनाची खरेदी करण्यासाठी, परदेश वारीसाठी अनेक जण कर्ज घेत असतात. ती व्यक्ती नेमकी कशासाठी कर्ज घेत आहे आणि किती रुपयांचे कर्ज घेत आहे, यावरून कर्जाचा व्याज दर ठरतो. म्हणजेच तुम्ही होम लोन घेतले तर तुम्हाला ते कमी व्याज दराने उपलब्ध होते. मात्र तेच जर तुम्ही पर्सन लोन घेतले तर तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागते. या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ते म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर (Credit score), क्रेडिट स्कोरलाच सिबिल स्कोर असे देखील म्हणतात. तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे, यावरून तुम्हाला लोन मंजूर होणार आहे की नाही? झाल्यास किती होणार हे ठरते. तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्हाला लोन मिळत नाही. आज आपण क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय? आणि तो कसा वाढवावा याबाबत माहिती घेणार आहोत.
क्रेडिट स्कोर म्हणजे नेमकं काय?
क्रेडिट स्कोर बाबत बोलायचे झाल्यास सामान्यपणे क्रेडिट स्कोर ही एक तीन अकांची संख्या असते. क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 अकांच्या दरम्यान असतो. तुमचा क्रेडिट स्कोर जेवढा चांगला असेल तेवढे अधिक फायदे तुम्हाला मिळतात. तुमचा बँकेशी किंवा इतर अर्थसंस्थांशी व्यवहार कसा आहे. घेतलेल्या लोनचे हप्ते तुम्ही वेळेत फेडत आहात का? तुमचे एखादे खाते हे एनपीए अतर्गंत आहे किंवा नाही या सर्व गोष्टींवर तुमचा क्रेडिट स्कोर अवलंबून असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोर हा 750 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कोणतीही बँक सहज कर्ज उपलब्ध करून देते.
क्रेडिट स्कोर कसा वाढवणार?
क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहे, तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर तुमच्या खात्यावरील ट्रन्झॅक्शन वाढवा. तुम्ही लोन घेतले असेल तर त्याचे नियमित हप्ते भरा. वस्तु खरेदी करताना वस्तू कॅशमध्ये न खरेदी करता ईएमआयवर खरेदी करा. खरेदी केलेल्या वस्तुचे नियमित हप्ते भरा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाचा अधिकाधिक वापर करा. या काही उपायांनी तुमचा क्रेडिट स्कोर वाढू शकतो. तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तर अनेक बँका तुम्हाला कर्ज देतात आणि त्याचा व्याज दर देखील कमी असतो.
संबंधित बातम्या
आता मुंबईत घर खरेदी होणार आणखी महाग; कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ
Todays Gold-Silver Rate: सोन्या, चांदीच्या घसरणीला ब्रेक, मौल्यवान धातुचे दर स्थिर
Inflation : कच्च्या तेलाच्या दराला आग, दैनंदिन वस्तूंचे भाव वाढण्याची चिन्ह, आणखी काय काय महागणार?