AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Challenge | सगळेच म्हणताय, बॉस असावा तर असा, हे चॅलेंज पूर्ण केल्यास देणार एक्स्ट्रा सॅलरी आणि 10 लाख..

Challenge | अगदी खरंय, हा बॉस वेगळा आहे. त्यानं कर्मचाऱ्यांना असलं काही अफलातून चॅलेंज दिलंय की, तुम्ही ही म्हणाल..बॉस असावा तर असा..

Challenge | सगळेच म्हणताय, बॉस असावा तर असा, हे चॅलेंज पूर्ण केल्यास देणार एक्स्ट्रा सॅलरी आणि 10 लाख..
बॉस तुसी ग्रेट हो..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 11:55 AM

नवी दिल्ली : आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं, काम (Task) करुन घेण्यासाठी असल्या काही क्लृप्त्या मालक (Boss) करतोच असतो. पण थांबा, कारण हा बॉस वेगळा आहे. त्यानं कर्मचाऱ्यांना असलं काही अफलातून चॅलेंज (Challenge) दिलंय की, तुम्ही ही म्हणाल..बॉस असावा तर असा..

झिरोधा (Zerodha) हे नावं तुम्ही ऐकलं नाही, असं तर होणार नाही. शेअर बाजाराशी संबंधित ही एक मोठी कंपनी आहे. नितीन कामत (Nitin Kamath) या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले चॅलेंज सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या चॅलेंजची अफाट चर्चा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामत यांनी जे बक्षिस जाहीर केले आहे, ते पाहुयात. हे आव्हान पेलणाऱ्या कर्मचाऱ्याला संपूर्ण महिन्याचा अतिरिक्त पगार देण्यात येणार आहे. वर्षभरात कर्मचाऱ्याने त्याचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. एका वर्षांत 90 टक्के आव्हान पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे.

हे चॅलेंज स्वीकारुन ते एक वर्षभर पूर्ण करायचे आहे. त्याबदल्यात कंपनी एक महिन्याचा अतिरिक्त पगार तर देईलच पण लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 लाख रुपये जिंकण्याची संधी ही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हे चॅलेंज कमाईचे एक साधन ठरणार आहे.

आता तुम्ही विचारात पडला असाल की, हे आव्हान आहे तरी काय? तर कामत यांनी कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंज ठेवले आहे. जो जेवढा जास्त फिट, त्याला तेवढे जास्त बक्षिस, असा हा फिटनेस फंडा आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे चॅलेंज ठेवण्यात आले आहे.

कामत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या आव्हानाची माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांची धुम्रपानाची सवय सोडण्यासाठी त्यांनी ही आयडियाची कल्पना लढवल्याचे सांगितले. स्मोकिंग सर्वात वाईट सवय असून ते करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

त्यांनी त्यांच्या फिटनेसबद्दल ही माहिती दिली. फिटनेस उद्दिष्ट्य समोर ठेवून त्यांनी लक्ष्य कसे प्राप्त केले. ते किती दिवसात पूर्ण केले याची माहिती कामत यांनी दिली. त्यांनी वजन कसे कमी केले याची माहिती दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे चॅलेंज दिल्याचे सांगितले.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.