'वंदे भारत' गाड्यांचे कोच लातूरच्या रेल्वे कारखान्यात तयार होणार!

‘वंदे भारत’ गाड्यांचे कोच लातूरच्या रेल्वे कारखान्यात तयार होणार!

| Updated on: Mar 04, 2023 | 4:25 PM

VIDEO | लातूरच्या रेल्वे कारखान्यात पहिल्या टप्प्यात २०० वंदे भारत रेल्वे गाड्यांचे कोच होणार तयार, बघा व्हिडीओ

लातूर : लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखाना सुरुवात करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे . त्यामुळे लवकरच लातूरच्या या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यातून १२० वंदे भारत रेल्वे तयार होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे . पहिल्या टप्प्यात २०० वंदे भारत रेल्वे गाड्यांचे कोच तयार केल्या जाणार आहेत, त्यापैकी १२० लातूरमध्ये तर उर्वरित ८० रेल्वे गाड्यांचे कोच हे चेन्नईमध्ये तयार होणार आहेत. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली असून अंतिम निश्चिती सुरु असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून २०० वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे .

Published on: Mar 04, 2023 04:25 PM