छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचं तांडव; एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृतू
याच महिन्यात फक्त पाचच दिवसआधी येथे पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका रात्रीत 17 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून येथे सर्वच पक्षांनी रूग्णालय प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला आहे.
ठाणे, 13 ऑगस्ट 2023 | ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे पुन्हा एकदा हादरले. याच महिन्यात फक्त पाचच दिवसआधी येथे पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका रात्रीत 17 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून येथे सर्वच पक्षांनी रूग्णालय प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला आहे. तर एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तर फक्त एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली असून या प्रकरणामुळं नव्या राजकीय वाद पेटला आहे. या वेळी मृत्यू झालेल्यांमध्ये वयोवृद्ध पुरुष आणि महिलांचा समावेश असून अत्यवस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचा खुलासा रुग्णालयाकडून केला जात आहे. तर रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

