नवी मुंबईमधील एकाच शाळेतील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मुंबई : राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे (School started) वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोना आणि ऑमिक्रोनचे संकट आहेच. तसेच सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावली देखील जारी केली होती. मात्र, असे असताना देखील नवी मुंबई येथून धक्कादायक माहिती पुढे येते आहे.घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.