जेवणातून 23 जणांना विषबाधा, 7 जणांवर उपचार सुरू; कुठं घडला धक्कादायक प्रकार?
VIDEO | यात्रेच्या मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, जुलाब उलट्यांचा त्रास झालेल्यांवर उपचार सुरू
सातारा : साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कराड तालुक्यात जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यूहू झालाय. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वहागावमधील हा धक्कादायक प्रकार आहे. 7 जणांवर सध्या कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील वहागाव येथे देवाच्या यात्रेच्या मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादाय घटना घडली. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वहागाव येथील तुकाराम राऊत वय 70 असणाऱ्या व्यक्तीचा विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. दरम्यान, विषबाधा झाल्यानंतर अनेकांना जुलाब उलट्यांचा त्रास झाला. त्यापैकी 15 जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
Published on: Jun 13, 2023 08:25 AM
Latest Videos