Tahawwur Rana : तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत आणखी 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहव्वुर राणाला आज म्हणजेच सोमवारी एनआयएने न्यायालयात हजर केले. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला सोमवारी कडक सुरक्षेत दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची 18 दिवसांची एनआयए कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज त्याला कोर्टात हजार करण्यात आलं. यावेळी एनआयएच्या पथकाने न्यायालयाकडून तहव्वुर राणाला १२ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. यावर, विशेष न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी एनआयएच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या तहव्वुर राणा याला कडक सुरक्षेत न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
Published on: Apr 28, 2025 04:25 PM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

