Tahawwur Rana : 26\11 चा मास्टमाईंड उद्या भारतात… तहव्वूर राणाला NIA ची टीम घेऊन येणार, सूत्रांची मोठी माहिती काय?
मुंबईत झालेल्या २६\११ चा दहशतवादी हल्ला हा मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे. मुंबईवर झालेला हा हल्ला कधीही न विसरण्यासारखा आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला उद्या भारतात आणण्यात येणार आहे.
मुंबईवर झालेल्या २६\११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला उद्या सकाळी भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला उद्या सकाळी दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे. एनआयएची टीम तहव्वूर राणाला घेऊन येणार आहे, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर तहव्वूर राणा भारतात आल्यानंतर सुरूवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत राहणार असल्याची शक्यता आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती आहे. तहव्वूर राणाला दाऊद गिलाना म्हणूनही ओळखलं जातं. एफडीआय या अमेरिकन तपास यंत्रणेने ऑक्टोबर २००९ मध्ये तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं. तहव्वूर राणा पाकिस्तानी- अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हेडलीला मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली २०१३ मध्ये दोषी आढळला होता.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
