Konkan Railway Megablock | चाकरमान्यांनू कोकणात चाललंत, ही बातमी वाचा;  उद्या 'या' मार्गावर ३ तासांचा ब्लॉक

Konkan Railway Megablock | चाकरमान्यांनू कोकणात चाललंत, ही बातमी वाचा; उद्या ‘या’ मार्गावर ३ तासांचा ब्लॉक

| Updated on: Sep 04, 2023 | 9:07 AM

VIDEO | कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, उद्या कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर कोकण रेल्वेते वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, कारण उद्या कोकण रेल्वेवर ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार

रत्नागिरी, ४ सप्टेंबर २०२३ | कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर कोकण रेल्वेते वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण कोकण रेल्वेवर उद्या ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुरूस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. करंजाडी ते चिपळूनदरम्यान उद्या दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होणार असून ३ वाजून २० मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी देखील कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. कोकण रेल्वे मार्गावरच्या कर्नाटक राज्यातील कुमठा ते कुंदापूर या दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी दोन एस्क्प्रेस गाड्यांवर या मेगा ब्लॉकचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Published on: Sep 04, 2023 09:07 AM