अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, यासह पहा इतर अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, यासह पहा इतर अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 17, 2022 | 4:21 PM

आपण कोणत्याही स्थितीत पक्षाचा आदेश पाळणार, अपक्ष लढणार नसल्याचेही मुरजी पटेल यांनी माघारीनंतर आपली भावना प्रकट केली.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पुन्हा एकदा पहायला मिळाली. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहना नंतर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी घोषणा केली. तर आपण कोणत्याही स्थितीत पक्षाचा आदेश पाळणार, अपक्ष लढणार नसल्याचेही मुरजी पटेल यांनी माघारीनंतर आपली भावना प्रकट केली. तर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल तर इतरांना आवाहन केल्याबाबत आपण ठाकरे, पवार आणि सरनाईक यांचे आभारी असल्याचे लटके यांनी म्हटलं आहे.

Published on: Oct 17, 2022 04:21 PM