काँग्रेसची भारत जोडो यात्रा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात येणार आहे. नांदेड,हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
अंधेरी पोट निवडणूकीत भाजपची भूमिका ही मनस्ताप देणारी होती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांनी अंधेरी पोट निवडणूकीत भाजपने पळ काढला असे देखिल खोचक टीका भाजपवर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीवरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली मात्र चांगलं बोलण्याचं कुणाला औदार्य नाही असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी tv9 ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा डाव भाजपचा असल्याचे म्हटलं आहे. तर राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गांधी घराणं एकत्र येणार आहे. तर महाविकास आघाडी एकत्र असल्याचा संदेश यातून देण्यात येणार आहे. तर काँग्रेसची भारत जोडो यात्रा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात येणार आहे. नांदेड,हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. तर राजन साळवी यांचं कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना गाडून ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला असे म्हटलं आहे.