4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 June 2021
20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.