4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 8 July 2021
पीयूष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार दिलाय. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांची सर्वत्र चर्चा आहे. (Modi cabinet expansion Full List Of Ministers In The Modi Government)
मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. तर नोकरशाहीत आपला ठसा उमटवलेल्या आश्विनी वैष्णव यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झालेला असून, त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालयासारख्या मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलंय. पीयूष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार दिलाय. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांची सर्वत्र चर्चा आहे. (Modi cabinet expansion Full List Of Ministers In The Modi Government)