चार महिन्याचे बाळ आजोबांच्या हातून निसटून नाल्यात वाहून गेलं, आईचा आक्रोश!
कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकलमधून उतरून पायी कल्याणच्या दिशेने जात असताना एका आजोबांच्या हातातून त्यांची चार महिन्यांची नात निसटून वाहत्या नाल्यात पडली. या घटनेमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | बुधवारी राज्यभरात प्रचंड पाऊस कोसळला. मुंबईत सकल भागात पाणी साचलं. वाहुतक ठप्प झाली. तसेच रेल्वेसेवा कोलमडली. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अनेक लोकल गाड्या बंद पडून आहेत. तासंतास गाड्या बंद असल्याने प्रवाशांनी अखेर रेल्वेखाली उतरुन घरी परतण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडी येथील योगिता रुमाले आपल्या वडीलांसह मुंबईहून भिवंडीकडे निघाली होती, तिच्यासोबत चार महिन्याची मुलगी होती. योगिता ही वडिलांसोबत अंबरनाथ लोकलमधून उतरून पायी कल्याणच्या दिशेने चालली होती. तेव्हा नाला पार करताना मुलगी तिच्या आजोबांकडे होती. त्याच्या हातातून ती हातातून निसटून वाहत्या नाल्यात पडली.
Published on: Jul 20, 2023 07:27 AM
Latest Videos